Crime News : छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात लाज आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने शरीरसंबंध ठेवतानाचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. नंतर तेच व्हिडिओ मित्रांना दाखवले आणि पुन्हा तरुणीशी शरीरसंबंध ठेवण्यास दबाव आणला. तरुणीने जेव्हा शरीरसंबंध ठेवण्यास विरोध केला असता, आरोपीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रत्नागिरी: 3 भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले.. नदीत बुडून दुर्दैवी अंत
संबंधित प्रकरण हे कोरबा जिल्ह्यातील बाल्को नगर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. मुख्य आरोपीची होरी लाल चौहान (वय 30) अशी ओळख पटली आहे. अल्पवयीन पीडित मुलगी ही 17 वर्षांची आहे. घडलेल्या घटनेनुसार, आरोपी मजूर म्हणून काम करतो आणि दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांनी अनेकदा लैंगिक संबंध ठेवले.
प्रियकराने लैंगिक संबंध ठेवले, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
प्रियकराने लैंगिक संबंध ठेवल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले, नंतर आरोपीने तो व्हिडिओ मित्रांना दाखवला, नंतर तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. अश्लील हावभाव करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक संबंध ठेवण्यास दबाव टाकला. जेव्हा पीडितेनं विरोध केला तेव्हा वारंवार धमक्या देण्यात आल्या. ते दोघे दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हे ही वाचा : सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी..
व्हिडिओच्या भीतीने पीडितेनं आपल्या भावाला या घटनेबाबत सांगितलं, नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत सर्व आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











