नाश्ता करताना मित्राच्या प्लेटमध्ये हात धुण्यावरून वाद, नंतर बेदम मारहाण करत संपवलं

crime news : पोलीस ठाणे परिसरात एका क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नाश्ता करताना दोन मित्रांमध्ये वाद झाला होता, नंतर त्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि या प्रकरणाला गंभीर हिंसक वळण लागून घटनेनं परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पुढील तपास केला.

crime news

crime news

मुंबई तक

• 04:14 PM • 21 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्लेटवर हात धुतल्याने मित्रानेच मित्राचा काढला काटा 

point

हल्ल्यात श्यामचा दुर्दैवी अंत 

Crime News : हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्लूर पोलीस ठाणे परिसरात एका क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नाश्ता करताना दोन मित्रांमध्ये वाद झाला होता, नंतर त्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि या प्रकरणाला गंभीर हिंसक वळण लागून घटनेनं परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पुढील तपास केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : केडीएमसी महापालिकेत ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, बंद दाराआड राजकीय खलबतं

प्लेटवर हात धुतल्याने मित्रानेच मित्राचा काढला काटा 

या घटनेनं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव श्याम पांचाळ (वय 28) असे आहे. श्याम हा उस्मान नगरमधील होम ट्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. तो नेहमीप्रमाणे नाश्ता करत होता, तेव्हा त्याचा आणि त्याच्या मित्रांत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि श्यामचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी सकाळी श्याम पांचाळ नाश्ता करत होते. त्याने अतुल सहानी यांच्या प्लेटवर हात धुतल्याचा आरोप करण्यात आला, यामुळे दोघांमध्ये वादंग झाल्याचं चित्र आहे. 

हल्ल्यात श्यामचा दुर्दैवी अंत 

नंतर त्यांचं मारहाणीत रुपांतर झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, या हिंसक वळणात अतुल सहानीने श्याम पांचाळवर हल्ला केला होता. या हल्ल्यात श्यामच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नंतर तो जमिनीवर पडला होता. दुखापत इतकी गंभीर होती की त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी तात्काळपणे पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती, परंतु तोवर खूप उशीर झाला होता. 

हे ही वाचा : इकडं अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच डीजीपी निलंबित; तिकडं स्मगलिंग प्रकरणात लेक आधीच तुरुंगात

या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोल्लूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. नंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. या प्रकरणी अतुल सहानी आणि मिथिलेश कुमार यांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु ठेवला आहे. 

    follow whatsapp