केडीएमसी महापालिकेत ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, बंद दाराआड राजकीय खलबतं

मुंबई तक

KDMC muncipal corporation : केडीएमसी महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेंच सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच केडीएमसी महापालिका निवडणुकीनंतर मनसे पक्षानं शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. मनसेच्या या भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरु झालेली आहे. दरम्यान, याचपार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मनसे माजी आमदार राजू पाटील एकत्रित दिसत असल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

ADVERTISEMENT

KDMC municipal corporation
KDMC municipal corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

केडीएमसी महापालिका महापौरपदासाठी शिंदे मनसेची साथ

point

उद्धव ठाकरे यांचे चार नगरसेवक नॉट रिचबल

KDMC muncipal corporation : राज्यात महापालिका निवडणुकीनंतर केडीएमसीच्या राजकारणात मोठा उलटफेर बघायला मिळत आहे. केडीएमसी महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेंच सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच केडीएमसी महापालिका निवडणुकीनंतर मनसे पक्षानं शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. मनसेच्या या भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरु झालेली आहे. दरम्यान, याचपार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मनसे माजी आमदार राजू पाटील एकत्रित दिसत असल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा : शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी 23 जानेवारीलाही होणार नाही? सुप्रीम कोर्टात काय घडलं? मोठी अपडेट समोर

केडीएमसी महापालिका महापौरपदासाठी शिंदे मनसेची साथ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे, राजू पाटील आणि नरेश म्हस्के यांच्यात बैठक झाल्याचं चित्र समोर आलं. या बैठकीत मनसेनं आम्ही महायुतीसोबत असल्याचं समर्थन दिल्याचं हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. केडीएमसी महापालिकेत मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले. याच केडीएमसी महापालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका असू शकते. अशातच भाजपनने देखील या निवडणुकीत 50 जागा जिंकून आपणच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला होता. पण, शिंदेसेनाने मनसेला जवळ करत आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 

उद्धव ठाकरे यांचे चार नगरसेवक नॉट रिचबल

अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचे चार नगरसेवक हे नॉट रिचबल लागत असल्याची माहिती समोर आली. असं बोललं जातंय की, हे चार नगरसेवक शिंदेसेनेलाच पाठिंबा देताना दिसत आहेत. सकाळी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीची प्रक्रियेच्या दरम्यान शिवसेनेच्या 53 नगरसेवकांसोबत मनसेचे 5 नगरसेवक देखील उपस्थित होते. शिवसेनेनं 53 नगरसेवकांचा अधिकारिक गट बनवला, त्यात मनसेनं आपला गटनेता प्रमुख म्हणून प्रल्हाद म्हात्रेची निवड केली होती. 

हे ही वाचा : इकडं अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच डीजीपी निलंबित; तिकडं स्मगलिंग प्रकरणात लेक आधीच तुरुंगात

कल्याण डोंबिवलीची निवडणूक भाजप आणि शिंदे सेनेने महायुती म्हणून एकत्र लढवली होती. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच स्थापन झालेल्या या युतीमुळे केडीएमसीची सत्ताव्यवस्था पूर्णपणे बदलली आहे आणि येत्या काळात महापालिकेचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp