Crime News: हरियाणातील मानसरोवर येथील धाना येथे कौटुंबिक वादातून पत्नीवर विटेने हल्ला केला. आरोपीला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रकरणात चौकशीदरम्यान आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत ही हत्या केली. आरोपीने आपल्या फोनद्वारे बोलताना ऐकलं. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केलं होतं.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुलगी आणि आईचे होते अनैतिक संबंध, शारीरिक संबंधासाठी चटावलेल्या दोघींनी केलं भयंकर कृत्य
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणाची 16 जून रोजी मानसरोवर पोलिसांना माहिती मिळाली की, धाना गावात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घरमालकाने सांगितलं की, 22 मे रोजी उत्तर प्रदेशातील बरेलीतील बारगाव येथील रहिवासी राजकुमारने त्याची पत्नी रुपा आणि दोन मुले विपिन आणि अफूलसह भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या मजल्यावरील 31 क्रमांकाची खोली देण्यात आली होती. राजकुमार आणि रूपा देवी एका कंपनीत काम करत होते. घराच्या काळजीवाहकाने मालकाला सांगितलं की, हत्येच्या दोन दिवसांआधी रुपा देवी आणि राजकुमार यांच्यात काही कराणास्तव वाद झाला.
राजकुमार अटकेत
साफसफाई करताना राजकुमारचा मुलगा विपिन हा बाहेर उभा होता. खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा रुपाचा मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक विटही दिसली. पोलिसांनी राजकुमारविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला. या प्रकरणात आता पोलिसांनी राजकुमारला अटक केली आहे.
हेही वाचा : वडील आणि भावाचा मृत्यू, आता बहिणीलाही.. टीम इंडियाच्या आकाश दीपची कहाणी वाचून तुम्हीही ढसाढसा रडाल!
या चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितलं की, तो खोलीत होता आणि रुपा बाथरुममध्ये कोणाशी तरीही फोनवर बोलत होती. 10 मिनिटांनी ती खोलीतून बाहेर आली तेव्हाने त्याने विचारलं क, ती बाथरूममध्ये कोणाशी बोलते. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देताच सांगितलं की, तो तिच्यावर लक्ष ठेवून आहे. यावरून संबंधिताला राग आनावर झाला आणि विट त्याने पत्नीच्या डोक्यात विट फेकून मारली. त्यामुळे ती जागेवर खाली कोसळली आणि डोक्यातून रक्त येऊ लागले.
ADVERTISEMENT
