आईनं पोटच्या दोन जिवांना संपवलं, नंतर स्वत:च्या आयुष्याचा केला एंड, सारं गाव पेटून उठलं

Crime News : महिलेनं दोन मुलांची हत्या केली आणि स्वत: जीवन संपवलं, नेमकं काय घडलं?

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:00 AM • 03 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतापलेल्या कुटुंबातील सदस्यांनी महिलेच्या पतीच्या घरावर केला हल्ला

point

महिलेनं पोटच्या दोन जिवांसह स्वत:च्या आयुष्याचा केला दि एंड 

Crime News : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील चेनारावटपेट मंडलातील गावात विवाहित महिलेच्या आत्महत्येच्या बातमीने खळबळ उडाली. मृत महिलेचे नाव बोडा श्रावंती असे होते, तिने हैदराबाद येथे दोन मुलांची हत्या करत स्वत:चा देखील जीवन प्रवास संपवला. या घटनेनं परिसरात शोक व्यक्त केला जात आहे, संबंधित घटनेनं संतापाची लाट पसरली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिलेनं स्वत:च्याच अंघोळीचे अश्लील व्हिडिओ बनवले, नंतर व्हायरल करत... मोठं कांड केलं

संतापलेल्या कुटुंबातील सदस्यांनी महिलेच्या पतीच्या घरावर केला हल्ला 

या घटनेनंतर संतापलेल्या कुटुंबातील सदस्यांनी बोडा माणिक्य थंडा गावातील महिलेच्या पतीच्या घरावर हल्ला केला आणि तोडफोड केली, नंतर घरच पेटवून दिले. ही घटना कौटुंबीक वाद आणि छळाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. घडलेल्या घटनेनुसार, बोडा श्रावंती ही रोजगाराच्या शोधात तिचा पती प्रवीणसोबत हैदराबाद येथे आली होती. ते कुकटपल्ली परिसरात भाडेतत्त्वावर भाड्याच्या घरात राहत होते, तिथेच भयानक घटना घडली

महिलेनं पोटच्या दोन जिवांसह स्वत:च्या आयुष्याचा केला एंड 

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, महिलेनं तिच्या दोन मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. संबंधित घटनेनंतर जेव्हा मृतदेह गावात आणण्यात आले असता, कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृतेच्या कुटुंबीयांनी आरोप केला असता, तिचा पती प्रवीण बऱ्याच काळापासून तिचा छळ करत होता. कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळामुळे श्रावंतीने भंयकर पाऊल उचलले. कुटुंबीयांनी तिच्या पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुण्यातून बाहेर पडण्यासाठी 3 महत्त्वाच्या महामार्गांवरील टोलचा दर वाढला, नवे दर आले समोर

गावात घबराट पसरली 

संतप्त कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी पतीच्या घरावर हल्ला करत घरातील वस्तूंची तोडफोड केली, नंतर ते घर पेटवून दिले आणि गावात घबराट पसरली. परिस्थिती बिघडल्याचे पाहता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित प्रकरणाचा तपास सुरु केला असता, आत्महत्येचे कारण आणि कौटुंबिक वादामागील सत्य उघडकीस आले.