crime news : अशोक खरात या भोंदू बाबाने केवळ राज्यचं नाहीतर भारताला हादरवून टाकलं आहे. अशोक खरातच्या अश्लील कृत्यानंतर आता देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यापाठोपाठ आता काही भोंदू बाबांचा कारणामा आणि त्यांचं कांड समोर येऊ लागलं आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलातील मॉल रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका साधू बाबाने एका तरुणीशी अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणेकरांसाठी मोठी बातमी, एप्रिलपासून वीज बिलात कपात होणार, महावितरणचा मोठा निर्णय
संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. अशातच पोलीस प्रशासन बाबाचा शोध घेण्यासाठी सक्रिय झाले. संबंधित बाबा हा राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील रहिवासी आहे. बाबाचे नाव नारायण दास (वय 36) अशी ओळख समोर आली.
बाबा रास्त्यावरून जाणाऱ्या तरुणींना चुकीचा स्पर्श करायचा
घडलेल्या वृत्तानुसार, शिमला येथील मॉल रोड परिसरात उच्चभ्रू भागातील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात एक बाबा रास्त्यावरून जाणाऱ्या तरुणींना चुकीचा स्पर्श करायचा. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली. यानंतर त्या ढोंगी बाबाच्या शिमलाला जाण्यापूर्वी मुसक्या आवळल्या.
हे ही वाचा : आरोपीने 8 वर्षाच्या मुलीला संपवलं, नंतर मृतदेह पिठाच्या डब्यात भरला अन् ... अंगावर काटा आणणारी घटना
नारायण दास बाबा राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील निवाई तहसीलच्या जामडोली गावत राहतात. तपासातून असे समोर आले की, आरोपी हा नारायण दास याने एप्रिल ते जून 2025 च्या दरम्यान शिमला गाठून भेट दिली. तो शुक्रवारी परत जाणार असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपीची ओळख पटल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











