सख्ख्या बहिणीला बनवलं वासनेची शिकार, घरात एकटीला पाहून भावानेच...

Crime News : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. फखरपुरमध्ये एका व्यक्तीने आपल्याच बहिणीला बळी ठरवलं आहे.

Crime News Brother made sister a victim of lust and sexually assaulted her

Crime News Brother made sister a victim of lust and sexually assaulted her

मुंबई तक

• 06:36 PM • 30 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली

point

भावाने डाव साधत तिच्यावर...

Crime News : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. फखरपुरमध्ये एका व्यक्तीने आपल्याच बहिणीला बळी ठरवलं आहे. तरुणाने आपल्याच बहिणीवर बलात्कार केला. घरात कोणीही नसल्याचे पाहून भावाने डाव साधत तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणातील कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत एकूण माहिती जाणून घ्या. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मोठी बातमी! निलेश चव्हाणला अखेर नेपाळ बॉर्डरवरून अटक

संपूर्ण प्रकरण काय होतं? 

बुधवारी बहराइचमध्ये घडलेल्या या संपूर्ण घटनेची माहिती सूत्रांनी पोलिसांना दिली आहे. संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, फखरपूर पोलीस ठाणे परिसरात एका गावातील 17 वर्षीय मुलीवर तिच्या 32 वर्षीय भावाने लैंगिक शोषण केलं आहे. ही घटना गेल्या रविवारी घडली असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत मुलीने आरोप केला की, पीडितेच्या भावानेच घरात कोणीही नसल्याची संधी साधत आपल्याच बहिणीवर हात टाकला. 

या घडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या आईने या घटनेवर मोठं वक्तव्य केलं आहे. या प्रसंगाची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्यात, पीडित मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले की, तिच्या वडिलांचे निधन झालं होतं. आरोपी भावाची आपल्याच बहिणीवर वाईट नजर होती. 

पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

रविवारी ती घरी एकटी असताना तिच्या भावाने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, पीडितेच्या आईने असेही म्हटले आहे की, आरोपीला ड्रग्जचं व्यसन आहे. त्याने यापूर्वी त्याच्या बहिणीचा विनयभंग केला होता. आरोपी हा अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. 

हेही वाचा : आरारा... 'RCB चा पराभव झाला तर मी नवऱ्याला घटस्फोट देणार', महिलेचा VIDEO तुफान व्हायरल

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारीत म्हटलं की, बदनामीच्या भीतीने कोणालाही काहीही सांगितलं नाही. जेव्हा तिच्या आईला याबाबत भनक लागली तेव्हा तिने या घटनेनंतर आपल्या लेकीला धीर दिला. अशा परिस्थितीत ती आपल्या मुलीच्या बाजून उभी राहिली होती. त्यानंतर तिने आपल्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, आरोपीला मंगळवारी आरोपीला अटक करण्यात आली. 

    follow whatsapp