16 वर्षीय मुलीने स्वत:ला संपवलं, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कळलं ती गर्भवती, 17 वर्षीय मुलाने...

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा झाला आहे की, मृत मुलगी गर्भवती होती.

Mumbai Tak

मुंबई तक

31 May 2025 (अपडेटेड: 31 May 2025, 09:05 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावतीत 16 वर्षीय मुलीने स्वत:ला संपवलं!

point

पोस्ट मार्टममध्ये कळलं मुलगी गर्भवती

अमरावती: शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका 16 वर्षीय मुलीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा झाला आहे की, मृत मुलगी गर्भवती होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> नौदलाचा इंजिनीअर हनीट्रॅपमध्ये अडकला, पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात फसून हेरगिरी करत थेट...

या माहितीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, शेजारी राहणारा 17 वर्षीय मुलगा त्यांच्या मुलीला बराच काळ मानसिकरित्या त्रास देत होता आणि धमकावत होता. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वीही या मुलाला त्यांच्या मुलीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती, परंतु तो तिला ब्लॅकमेल करत राहिला.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, हा अल्पवयीन मुलगा मुलीला ब्लॅकमेल करायचा आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला त्रास देत होता, ज्यामुळे ती गर्भवती झाली असावी. बदनामीच्या भीतीने तिला मानसिक दबावाखाली ठेवल्याने तिने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

हे ही वाचा >> VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीची हत्या, माजी BJP नेत्याचा मुलाला जन्मठेप

गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिनेश दहातोंडे यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी मुलाविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी करत आहेत.

    follow whatsapp