'चंगळ्या आणि त्याची आई...' केस दाखल करणारी तरुणी नेमकी काय म्हणाली?

मुंबई तक

31 May 2025 (अपडेटेड: 31 May 2025, 04:45 PM)

Changlya Bole Kuhu : पुणे जिल्ह्यातील एका तरुणाने रिल्सच्या माध्यमातून आपल्या शैलीत डायलॉगबाजी करत अनेक चाहते जोडले आहे. चेंगळ्या बोले कुहू असा त्याचा डायलॉग असून या डायलॉगची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र, याच चेंगळ्याला पुण्यातील एका वकिलाने नोटीस जारी केली आहे.

get legal notice from Advocate wajed khan

get legal notice from Advocate wajed khan

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चंगळ्याला वकिलाकडून नोटीस जारी

point

कारण आता समोर आलं आहे

Changlya Bole Kuhu : सोशल मीडियावर कधी कोण कसं प्रसिद्धीझोतात येईल हे सांगता येत नाही. प्रमुख्याने इन्स्टाग्रामवर अनेक ग्रामीण भागातील लोक रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील एका तरुणाने रिल्सच्या माध्यमातून आपल्या शैलीत डायलॉगबाजी करत अनेक चाहते जोडले आहे. चंगळ्या बोले कुहू असा त्याचा डायलॉग असून या डायलॉगची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र, याच चेंगळ्याला पुण्यातील एका वकिलाने नोटीस जारी केली आहे. चंगळ्याला नोटीस पाठवण्याचे कारण आता समोर आलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे

चंगळ्याला नोटीस जारी केल्याने आता तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. दरम्यान, या प्रकरणात नोटीस बजावणाऱ्या वकिलाचे नाव हे वाजेद खान बिडकर असे आहे. वकिलांनी रिल्सस्टार शुभम माळवे यांच्यावर एका तरुणीची बदनामी केल्या प्रकरणी आरोप केला. तरुणीने वकिलास नोटीस बजावण्यात सांगितली होती. तरुणीचे नाव प्रतिक्षा शिंदे असल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिक्षाने आपल्या पतीचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. 

याचपार्श्वभूमीवर शुभम माळवे आणि त्याच्या आईवर तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, शुभम माळवे आणि त्याची आई खोटे व्हिडिओ बनवत प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न करत असल्याचं वकील म्हणाले. वकिलांनी याआधी स्वारगेट आत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची केस हातात घेतली होती. त्यानंतर आता ते रिल्सस्टार्स चेंगळ्या विरोधात केस लढणार असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणात आता वाजेद खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

वकील वाजेद खान प्रतिक्रिया 

वाजेद खान म्हणाले की, प्रतिक्षा शिंदे आणि शुभम माळवे हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. पण शुभम माळवेनं मुद्दामहून तरुणीच्या पतीबाबत अवमानकारक भाष्य करत व्हिडिओ बनवले. त्यामुळे पती आणि पत्नी या दोघांनाही मानसिक त्रास झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशातच शुभम माळवे आणि त्याच्या आईला येत्या 7 दिवसांतच नोटीशीचे उत्तर द्यावं लागणार आहे. 

हेही वाचा : साई संस्थानातील कर्मचाऱ्याने दक्षिणा पेटीतील 'एवढी' रक्कम केली लंपास, असा झाला भांडाफोड

दरम्यान, शुभम माळवे हा मूळचा इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील आहे. चेंगळ्या बोले कुहू या डयलॉगने त्याने आपला चाहता वर्ग कमावला आहे. मात्र, वकिलाने नोटीस पाठवल्याने शुभम माळवे काय प्रतिक्रिया देईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.