साई संस्थानातील कर्मचाऱ्याने दक्षिणा पेटीतील 'एवढी' रक्कम केली लंपास, असा झाला भांडाफोड

मुंबई तक

31 May 2025 (अपडेटेड: 31 May 2025, 07:33 PM)

Shirdi crime news : शिर्डीतील साईबाबा संस्थानाच्या लेखा विभागात कार्यरत असणारे बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली आहे. लेखा विभागातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात अविनाश विनायक कुलकर्णी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवली होती. 

 Shirdi Crime News Sai Sansthan employee embezzles money from Dakshina box

Shirdi Crime News Sai Sansthan employee embezzles money from Dakshina box

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिर्डीतील साई संस्थानात चोरी

point

कर्मचाऱ्यानेच लंपास केली रक्कम

shirdi crime news : शिर्डीतील साईबाबा संस्थानचे लेखा विभागात कार्यरत असणारे बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून मोठी रक्कम लंपास केली आहे. लेखा विभागातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात अविनाश विनायक कुलकर्णी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवली होती. यामुळे कर्मचाऱ्याला कमावरुन बडतर्फ करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे

नेमकं काय घडलं होतं? 

साई संस्थानने माहिती दिली की, एप्रिल 2025 मधील दक्षिणा पेटीतील पैशाच्या मोजणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. लेखा विभागातील शिपाई असणारे बाळासाहेब नारायण गोंदकर यांना 4,8 आणि 11 एप्रिल रोजी भक्तांनी केलेलं दान मोजताना 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. दरम्यान ही रक्कम 45 - 50 हजार रुपये असून लंपास केली असल्याचं बोललं जात आहे. 

कर्मचाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे संस्थानने कर्माचाऱ्याला कामावरुन बडतर्फ केलं आहे. त्यावेळी कर्मचारी नोटा लपवताना स्पष्टपणे दिसत आहे. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर दिसतं की, कर्मचाऱ्याने पँटमध्ये आणि मशीनच्या मागे पैसे लपवून ठेवले होते. सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, अविनाश कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संस्थानने गोंदलकर याला अगोदर प्राथमिक माहितीवर निलंबित केलं होते. संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर झाल्यानंतर गुन्हा दाखल करुन बडतर्फीची कारवाई सरु केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत. 

हेही वाचा : 40 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय, थेट धारदार शस्त्राने केले वार अन्...

शिर्डी संस्थान उडवण्याची मेलद्वारे दिली होती धमकी 

दरम्यान, मध्यंतरी एका मेलवरुन शिर्डी संस्थान पाईप बॉम्बने उडवून टाकू अशी धमकी आली होती. ही घटना 2 मे  2025  रोजी घडली होती. अजित जक्कुमोला यांच्या नावाने धमकीचा मेल आला होता. यामुळे शिर्डीत भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. 

साई संस्थानचे अधिकारी रोहिदास माळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 351(4) अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.