मोठी बातमी! निलेश चव्हाणला अखेर नेपाळ बॉर्डरवरून अटक

मुंबई तक

Vaishnavi Hagawane Case वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन घटनांमध्ये ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहेत. नुकतीच वैष्णवीच्या वडिलांना आणि पतीला अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

Nilesh Chavan Arrest
Nilesh Chavan Arrest
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन घटनांमध्ये ट्विस्ट निर्माण होतायत

point

वैष्णवीची नणंद करिष्माचा मित्र निलेश चव्हाणला अटक करण्यात आली

Nilesh Chavan Arrest : वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट घडताहेत. नुकतीच वैष्णवीच्या सासऱ्यांना आणि पतीला अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कटात समावेश असणाऱ्या वैष्णवीच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाण गायब होता. मात्र आता निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. आज 30 मे रोजी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी! निलेश चव्हाणला अखेर नेपाळमध्ये अटक

नेपाळमधून नराधम निलेश चव्हाण अटकेत

वैष्णवी आणि तिच्या सासरच्यांना अटकेनंतर निलेश चव्हाणलाही नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी अनेक पथकं तयार केली होती. ज्यात विशेष पथकांचाही समावेश करण्यात आला होता. आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोधमोहीम राबवण्यात आली होती. ज्यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणावर लक्ष्य देऊन होते.

निलेश चव्हाण हा परदेशाबाहेर फरार झाला असल्याचं आता उघडकीस आलं. आरोपीला परदेशाबाहेर अटक करणं हे पुणे किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या अवाक्याबाहेरील होतं. परदेशाबाहेरील आरोपीला अटक करण्यासाठी निलेशच्या प्रत्यार्पण प्रक्रियेअंतर्गत मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. वैष्णवीचं बाळ देण्यास नकार देऊन निलेशनेच वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना अनेकदा धमकावले होते. पोलिसांनी त्याच्यावर काही गुन्हे दाखल करत स्टँडिंग वॉरंटही काढल्याचे वृत्त आहे. 

वैष्णवीचं बाळ हे निलेश चव्हाणकडे असल्याचे वृत्त होते. वैष्णवीच्या माहेरचे लोक बाळासाठी वैष्णवीच्या घरी गेले होते. मात्र, निलेश चव्हाणने आपल्याकडे असणाऱ्या शस्त्राचा धाक धाकवून बाळ देणार नाही, असे सांगत अनेकदा धमकावण्यातही आले. यावर अनिल कस्पाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा : पुतण्याचे काकीसोबत शारीरिक संबंध, निळ्या ड्रमला घाबरून पतीने घेतला भलताच निर्णय!

वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे म्हणाले की, वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी मी माझ्या भावाला घेऊन पाठवलं होत. माझ्या लेकीच्या मृत्यूनंतर मी पूरता हेलावून गेलो होतो. माझी मानसिकता खचून गेली होती. मला वैष्णवीच्या अंत्यविधीनंतर माझ्या दाजींना करिष्मा हगवणेला फोन केला होता. अशावेळी आमच्या बाळाची मागणी केली होती. पण बाळ देण्यापासून त्यांनी आम्हाला जुमानलं नाही, टाळाटाळ केली, असे अनिल कस्पटे म्हणाले होते. 


हे वाचलं का?

    follow whatsapp