मधुचंद्राच्या स्वप्नांचा चक्काचूर, नवरदेवाने केलं मोठं कांड..; आता लग्न सोडाच तुरुंगात जाणार आयुष्य

Crime News : जनरेटर न मिळाल्याने संतापलेल्या नवरदेवाने टेंट चालकाच्या मुलावर आपल्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ज्या नवरदेवाची 20 एप्रिल रोजी वरात निघणार होती, तो आता तुरुंगात पोहोचला असून त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रियाही प्रशासनाने सुरू केली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

20 Apr 2026 (अपडेटेड: 20 Apr 2026, 10:44 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मधुचंद्राच्या स्वप्नांचा चक्काचूर, नवरदेवाने केलं मोठं कांड..;

point

आता लग्न सोडाच तुरुंगात जाणार आयुष्य

UP Crime News : उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने लग्नाच्या मंगलमय वातावरणाचे रूपांतर एकाएकी पोलीस कारवाईत आणि भीतीमध्ये केले. एका नवरदेवाला केवळ जनरेटर न मिळणे इतके अपमानास्पद वाटले की, त्याने रागाच्या भरात टेंट चालकाच्या मुलावर आपल्या परवानाधारक पिस्तुलातून थेट गोळी झाडली. ज्या नवरदेवाच्या अंगाला हळद लागणार होती आणि ज्याची 20 एप्रिल रोजी थाटामाटात वरात निघणार होती, तो नवरदेव आता विवाह मंडपाऐवजी तुरुंगाच्या गजाआड पोहोचला आहे. या प्रकरामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हे वाचलं का?

जुन्या थकबाकीवरून वाद आणि रागाच्या भरात गोळीबार

ही संपूर्ण घटना जमानिया तहसील अंतर्गत येणाऱ्या देवढी गावातील आहे. या गावातील वीर बहादूर नावाच्या तरुणाचे लग्न 20 एप्रिल रोजी बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील माँ मुंडेश्वरी मंदिरात होणार होते. लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच, 17 एप्रिलच्या संध्याकाळी वीर बहादूरला जनरेटरची आवश्यकता भासली. तो गावातीलच टेंट व्यावसायिक इमामुद्दीन यांच्याकडे जनरेटर मागण्यासाठी गेला होता. मात्र, वीर बहादूरकडे आधीचे काही पैसे थकीत असल्याने इमामुद्दीन यांनी त्याला जनरेटर देण्यास नकार दिला. ही बाब वीर बहादूरला आपला अपमान वाटली आणि त्याने तिथेच इमामुद्दीन यांच्याशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आरोपी नवरदेव अटकेत आणि हळदीच्या दिवशी पसरला सन्नाटा

विवाद विकोपाला गेल्याचे पाहून इमामुद्दीन यांचा मुलगा दिलनवाझ हा मध्यस्थी करण्यासाठी तिथे आला होता. मात्र, रागाच्या भरात असलेल्या वीर बहादूरने संतापाच्या भरात आपली परवानाधारक पिस्तूल बाहेर काढली आणि दिलनवाझवर गोळी झाडली. ही गोळी दिलनवाझच्या हाताला लागली आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच कोसळला. वारंवार फायरिंग करून दहशत निर्माण केल्यानंतर आरोपी वीर बहादूर आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाला. पोलिसांनी तक्रार मिळताच वेगाने तपास चक्रे फिरवली आणि नवरदेव वीर बहादूरला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली. शनिवारी वीर बहादूरची हळद लागणार होती, मात्र त्याच्या घरी आनंदाच्या गाण्यांऐवजी केवळ शांतता आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.

वैद्यकीय निष्काळजीपणा आणि शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया

गोळी लागून जखमी झालेल्या दिलनवाझला कुटुंबीयांनी रात्री २ च्या सुमारास गाझीपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत त्याच्यावर कोणतेही उपचार न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या दिलनवाझच्या आईने रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ घातला, तेव्हा कुठे रुग्णालय प्रशासनाला जाग आली आणि जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी वाराणसी येथील बीएचयू (BHU) ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले. वीर बहादूरच्या वडिलांच्या हत्येनंतर त्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्याला हे पिस्तूल दिले होते, मात्र आता या हिंसक कृत्यानंतर त्याचा शस्त्र परवाना कायमचा रद्द करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तीन वर्षांचं प्लॅनिंग, 100 सीसीटीव्ही आणि गुन्हेगारासोबत अनैतिक संबंध, बायकोनं नवऱ्याचं काय केलं?