'वेस्टर्न स्टाइल प्रपोज करते', बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं अन् प्रेरणाने... 'ती' गोष्ट समजली तर तुमच्याही पायाखालची जमीन हादरेल!

बंगळुरूच्या अंजना नगरमध्ये, एका तरुणीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले, त्याचे हातपाय बांधले आणि 'वेस्टर्न स्टाइल प्रपोज'च्या नावाखाली त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा या भयानक कटाची संपूर्ण कहाणी उघडकीस आली.

claiming she was making a western style proposal prerana from bengaluru set her boyfriend kiran on fire lover burned Prerana simultaneously filmed entire incident in mobile phone

Bengaluru Crime

मुंबई तक

23 Apr 2026 (अपडेटेड: 23 Apr 2026, 07:26 PM)

follow google news

बंगळुरू: एका तरुणीला तिच्या प्रियकराला प्रपोज करायचं होतं, म्हणून तिने त्याला घरी बोलावले. तिने तिच्या प्रियकराला वेस्टर्न स्टाइल प्रपोज करण्याचा आग्रह धरला. ठरल्याप्रमाणे तिचा प्रियकर आला. प्रेयसीने आधी त्याचे हात आणि नंतर पाय बांधले. शेवटी, तिने त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. पण त्यानंतर झालेला खून हा आपल्या देशात क्वचितच घडलेला गुन्हा आहे. ही कहाणी कोणालाही धक्का देणारी आहे. प्रेयसी केवळ प्रियकराची हत्या करूनच थांबली नाही तर तिने पुढे जे काही केलं त्याने सगळेच हादरून गेले आहेत.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

बंगळुरूच्या अंजना नगरमधील एक घर मंगळवारी (21 एप्रिल) अचानक चर्चेचा विषय बनले. घराच्या दुसऱ्या मजल्यावर, डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील फ्लॅटच्या बाहेरील भिंतीवर काजळीसारखा पदार्थ दिसत होता. अजूनही थोडासा धूर निघत होता. घराच्या एका भागात एक माणूस फरशी साफ करत होता, जिथे जळलेल्या काळ्या रंगाचे काही थर साचले होते. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बाहेर उभ्या होत्या आणि इमारतीभोवती लोकांची गर्दी जमली होती.

27 वर्षीय प्रेरणाला पोलीस याच फ्लॅटमधून खाली घेऊन आले. प्रेरणा तिच्या आई आणि मोठ्या भावासोबत त्याच घरात राहत होती, जिथे धूर निघत होता. त्या घरातून एक जळालेला मृतदेहही सापडला. तो मृतदेह इतका विद्रूप झाला होता की तो पाहणेही कठीण होते. या घटनेच्या खोलात जाण्यापूर्वी, आपण तिची रूपरेषा समजून घेऊया.

प्रेरणाने जे केलं त्याचा विचारही कुणी करणार नाही!

काही वेळापूर्वी, दोन प्रेमी ऐन रंगात आले होते.. वेस्टर्न स्टाइल प्रपोज गेम. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, पाश्चात्य देशांमध्ये मुले आणि मुली ज्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करतात, त्यासारखाच एक 'रोल-प्ले'. प्रेयसी तिच्या प्रियकरासोबत हा खेळ खेळत होती. या खेळाची सुरुवात पुष्पगुच्छाने झाली. प्रियकर घरी येताच, प्रेयसीने फुलांचा गुच्छ देऊन त्याचे स्वागत केले.

हे ही वाचा>> वेस्टर्न स्टाईल प्रपोज करतो म्हणाली अन् बेडवरच जिवंत जाळलं, शारीरिक संबंधानंतर प्रेयसीने प्रियकराला का संपवले?

त्यानंतर, तिने प्रियकराचे हात-पाय पट्ट्याने बांधले आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. मग ती त्याला पलंगावर घेऊन गेली. ती काही वेळ त्याच्यावर प्रेम व्यक्त करू लागली, पण अचानक उठून ती उभी राहली. त्यानंतर खोलीत आधीच आणून ठेवलेल्या एका बाटलीतील रॉकेल आणि पेट्रोल तिने आपल्या हातात घेतलं. त्यानंतर पुढच्याच क्षणी तिने संपूर्ण बाटली तिच्या प्रियकरावर ओतली आणि त्यानंतर झटकन तिने प्रियकराला पेटवून दिलं. यावेळी प्रियकर जीवाच्या आकांताने ओरडू लागला, पण प्रेयसी त्याच्यासमोर अत्यंत निश्चलपणे उभी राहली. इतकेच नाही, तर तिने आपला मोबाइल फोन उचलला आणि संपूर्ण घटना आपल्या मोबाइलमध्ये शूटही केली.

आता या घटनेचा आणखी एक पैलू समोर येतोय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 27 वर्षीय प्रेरणाचे वडील म्हैसूरमध्ये तैनात असलेले पोलीस अधिकारी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर, ती तिच्या आई आणि मोठ्या भावासोबत बंगळूरला राहायला आली. ती व्होडाफोनमध्ये सिम-संबंधित सेवा आणि ग्राहक सेवेत मदत करण्याचे काम करत होती. तिचा मोठा भाऊ गिरीशंकर आणि आईसुद्धा नोकरी करत होते.

हे ही वाचा>> अनैतिक संबंधाचा संशय, 48 वर्षीय नवऱ्याने 52 वर्षीय बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं, प्रकरणाला वेगळं वळण

27 वर्षीय किरणही व्होडाफोनमध्ये काम करत होता. त्यांची भेट तिथेच झाली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. ते एकमेकांना जवळपास वर्षभरापासून ओळखत होते. त्यांची पहिली भेट गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती, पण 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेरणाने किरणला लग्नाची मागणी घातली आणि त्याने ती स्वीकारली.

काळानुसार त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. प्रेरणाने किरणला तब्बल 4.5 लाख रुपयांची मोटारसायकल आणि मोबाइल फोन भेट देण्याची योजना आखली होती. पण मग, कथेला एक नवीन वळण लागलं. प्रेरणाच्या लक्षात आले की, किरण पुन्हा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडशी बोलू लागला आहे. तिला असेही वाटले की, किरण तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे दोघांमध्ये बरेच दिवस भांडणं सुरू होती.

हे सर्व सुरू असतानाच, दोन दिवसांपूर्वी प्रेरणाने किरणच्या मोबाइल फोनवर त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीचा फोटो पाहिला. कदाचित त्याच दिवशी तिने एक भयंकर निर्णय घेतला. किरणला मारून आत्महत्या करण्याचा.

21 एप्रिलच्या सकाळी, तिची आई कामावर गेली आणि तिचा भाऊही घरातून बाहेर गेला. तो थोड्या वेळासाठी फोन चार्ज करायला परत आला, पण नंतर निघून गेला. आता प्रेरणा घरी एकटीच होती. तिला माहीत होते की, किरण अद्याप कामावर गेलेला नसेल. त्यामुळे तिने किरणला फोन करून घरी बोलावले आणि सांगितले की, ती त्याला वेस्टर्न स्टाइल प्रपोज करणार आहे आणि एक गिफ्ट देणार आहे.

किरणला वाटले की, त्याला कदाचित एक महागडी भेटवस्तू मिळेल, म्हणून तो सकाळी 11 च्या सुमारास आनंदाने तिच्या घरी पोहोचला. प्रेरणाने पुष्पगुच्छ देऊन किरणचे स्वागत केले. ते दोघे खोलीत गेले. थोड्या वेळाने, प्रेरणा म्हणाली की, तिला त्याला वेस्टर्न स्टाइल प्रपोज करायचे आहे. किरण तयार झाला. प्रेरणाने आधी किरणचे हात बांधले. पण जेव्हा ती त्याचे पाय बांधू लागली, तेव्हा किरण घाबरला. मग प्रेरणाने समजावून सांगितले की, वेस्टर्न स्टाइलमध्ये असेच प्रपोज करायचे असते. त्यामुळे किरण या गोष्टीसाठी तयार झाला. त्याचे हात आणि पाय बांधल्यानंतर, प्रेरणाने शेवटी किरणच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. ते दोघं त्याच स्थितीत पलंगावर पडून राहिले. सर्व काही ठीक होते.

पण मग प्रेरणा अचानक पलंगावरून उठली. किरणला असे वाटले की प्रेरणा त्याच्यावर पाणी ओतत आहे. पण मग, वासावरून त्याच्या लक्षात आले की, ते पाणी नसून रॉकेल किंवा पेट्रोल आहे. किरण घाबरला आणि ओरडू लागला. पण, त्याचे हात आणि पाय घट्ट बांधलेले असल्यामुळे तो पळून जाऊ शकला नाही. खरं तर, प्रेरणाने तिच्या घरात पेट्रोल आणि रॉकेल आधीच आणून ठेवलं होतं. तिने तीच बाटली किरणवर ओतली आणि पुढच्याच क्षणी किरणला पेटवून दिले. जळताना किरण वेदनेने किंचाळत आणि तडफडत होता, तर प्रेरणा त्याच्या जळण्याचा क्षण तिच्या मोबाइल फोनवर रेकॉर्ड करत होती.

थोड्या वेळाने त्याचे ओरडणे थांबले. त्याचे शरीर निश्चल पडले होते. त्यानंतर प्रेरणा थेट दुसऱ्या खोलीत गेली, जिथे तिने आधीच विष विकत घेतले होते. ते पिऊन आत्महत्या करण्याचा तिचा विचार होता. पण किरणला मरताना पाहून ती घाबरली आणि तिने आपला विचार बदलला.

दरम्यान, घरातून धूर निघताना पाहून एक शेजारी त्यांच्या घरी आला आणि त्याने तात्काळ मदतीचा हात पुढे केला. त्याने प्रेरणाला ब्लँकेटने झाकून बाहेर नेले आणि तिच्या भावाला माहिती दिली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. जेव्हा पोलीस आले, तेव्हा प्रेरणाने सुरुवातीला सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ती बाथरूममध्ये होती आणि आग कशी लागली हे तिला माहीत नाही, असे तिने सांगितले. पण घटनास्थळी सापडलेली पेट्रोलची बाटली, सीसीटीव्ही फुटेज आणि किरणचे बांधलेले हातपाय यांमुळे सत्य समोर आले. अखेरीस, प्रेरणाने आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांना तिच्या खोलीत विषाची एक बाटली आणि काही गोळ्याही सापडल्या. सध्या, पोलिसांचा असा विश्वास आहे की ही संपूर्ण घटना एक पूर्वनियोजित कट होता. पोलीस किरणच्या पूर्वीच्या प्रेयसीचीही चौकशी करत आहेत आणि प्रेरणाला अशा 'वेस्टर्न स्टाइल प्रपोजची' आणि भीषण हत्येची कल्पना कुठून सुचली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.