आई आणि भावावर लोखंडी सळीने केले सपासप वार, घराच्या अंगणातच रक्ताचा सडा, 23 वर्षीय तरुणीने सगळंच संपवलं

एका 23 वर्षीय तरुणीने आपला भाऊ आणि आईची हत्या केली आहे. लोखंडाच्या सळीने दोघांवर वार करत तरुणीने त्यांना जागेवरच संपवले. यामागे नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:10 PM • 23 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई आणि भावावर लोखंडी सळीने केले सपासप वार

point

घराच्या अंगणातच रक्ताचा सडा

point

23 वर्षीय तरुणीने सगळंच संपवलं

Crime News : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये बुधवारी (22 एप्रिल) संध्याकाळी एक थरारक घटना उघडकीस आली. एका 23 वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईची आणि भावाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, रात्री आठच्या सुमारास जेव्हा गावच्या चौकीदाराने पोलिसांना या घटनेची माहिती दिली, तेव्हा ही बाब समोर आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन मृतदेह पाहून अधिकारीही चक्रावून गेले.

हे वाचलं का?

लोखंडी सळीने वार

या घटनेतील मृतांची ओळख मुन्नी देवी आणि त्यांचा मुलगा राजीव अशी पटली असून, आरोपी मुलगी अनिता हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अनिताने घरातील लोखंडाच्या सळीने आणि गुरांना बांधण्याच्या खुंट्याने आई आणि भावावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घराच्या अंगणात आई आणि मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण गाव हादरले असून, घटनेनंतर परिसरात मोठी शांतता पसरली आहे.

हे ही वाचा : "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

मानसिक अस्वास्थ्यामुळे हल्ला

या दुहेरी हत्याकांडामागे कौटुंबिक वाद हे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की, अनिताची मानसिक स्थिती गेल्या काही काळापासून ठीक नव्हती. हे कुटुंब आधीच आर्थिक आणि सामाजिक दडपणाखाली होते, त्यातच अनिताच्या वागण्यावरून घरात सतत तणावाचे वातावरण असायचे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास याच तणावाचा स्फोट झाला आणि त्याचे रूपांतर या भीषण हत्याकांडात झाले.

हे ही वाचा : मतदानानंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, दादांच्या आठवणीने कंठ दाटला; नेमकं काय म्हणाल्या?

मोठ्या भावाने केली तक्रार

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कुंवर आकाश सिंह यांनी सांगितले की, आरोपी तरुणीला अटक करण्यात आली असून तिच्या मोठ्या भावाच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. आरोपी अनिताची मानसिक स्थिती तपासण्यासाठी तिची वैद्यकीय चाचणीही केली जाणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, या घटनेने सामाजिक स्तरावर पुन्हा एकदा मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.