क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर सतत ब्लॅकमेल केलं... लाज आणणारी घटना

मुंबई तक

22 Apr 2026 (अपडेटेड: 22 Apr 2026, 03:32 PM)

Crime News : एका महाविद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला कलंकीत करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका क्रीडा शिक्षकाने एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ बनवल्याने लोक संतप्त झाले आहेत. निषेध व्यक्त करत ते शाळेत पोहोचले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला

point

शिक्षकाला विद्यालय पाठिशा घालत असल्याचा नागरिकांचा आरोप

Crime News : उत्तराखंडच्या चकरपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला कलंकीत करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका क्रीडा शिक्षकाने एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ बनवल्याने लोक संतप्त झाले आहेत. निषेध व्यक्त करत ते शाळेत पोहोचले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोकांच्या हातून संबंधित शिक्षकाला सोडवले. 

हे वाचलं का?

क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला

चकरपूर अंतर महाविद्यालयीत एका क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला होता, नंतर तो व्हिडिओ सार्वजनिकरित्या व्हायरल करण्याची धमकी दिली होती. जेव्हा विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आणि इतरांच्या हे लक्षात आले असता, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी बोलावल्यावर, आरोपी शिक्षकाने तो व्हिडिओ डिलीट केला. 

विद्यालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित

बुधवारी पालकांसह काही सामाजिक संघटनेचे लोक शाळेत पोहोचले. त्यांनी या घटनेविरोधात आवाज उठवला, त्यांच्या जाण्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. लोकांनी विद्यालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच ग्रामस्थांनी तसेच काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दावा केला की, बीईओ हे शाळेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 

व्यवस्थापकांनी शिक्षकाला संपूर्ण संरक्षण दिले आहे. संबंधित शिक्षक हा अनेक विद्यार्थिनींचे चित्रिकरण करायचा आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा. अशातच प्राचार्यांनी बीईओकडे आरोपी शिक्षकावर कारवाईची मागणी केली, मात्र, कारवाई केली नाही. या प्रकरणात, शाळेचे व्यवस्थापकीय संचालक आणि कुशवाहाचे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आरोपी शिक्षण सुखविंदर सिंह यांना निलंबित करण्यात आले.