'बायको साडी नेसत नाही, सतत नाईट ड्रेस घालते..' संतापलेल्या नवऱ्याने अखेर काय केलं बघा..

बायकोच्या कपड्यांवरुन नवरा-बायकोत वाद झाला. अनेकदा सांगून बायको साडी नेसायला तयार नव्हती. त्यानंतर नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:10 AM • 23 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'बायको साडी नेसत नाही, सतत नाईट ड्रेस घालते..'

point

संतापलेल्या नवऱ्याने अखेर काय केलं बघा..

Crime News : कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पत्नीने साडीऐवजी नाईट ड्रेस घातल्याच्या रागातून पतीने तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड गावात मंगळवारी (21 एप्रिल) रात्री ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

तिने साडीतच रहावे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय कृष्णा पाटील असे आरोपी पतीचे नाव असून 32 वर्षीय मंजुळा पाटील असे पीडित पत्नीचे नाव आहे. कृष्णाला त्याच्या पत्नीने नाईट ड्रेस घातलेला आवडत नसे, तिला नेहमी साडीतच राहावे असे त्याचे म्हणणे होते. याच कपड्यांच्या कारणावरून या दांपत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत खटके उडत होते आणि वारंवार भांडणे होत होती.

हे ही वाचा : मालेगाव बॉम्बस्फोट: CBI, NIA च्या तपासानंतरही शेवटचे चारही आरोपी निर्दोष, मग दोषी कोण?

रॉकेल ओतून पेटवले

घटनेच्या दिवशीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर पाहता पाहता हिंसक वळणात झाले आणि रागाच्या भरात कृष्णाने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला आग लावून दिली. या जीवघेण्या हल्ल्यात मंजुळा या सुमारे 80 टक्क्यांहून अधिक भाजल्या गेल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

हे ही वाचा : Personal Finance: स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न ठरू शकते महागडे! Home Loan घेताना करू नका 'या' चुका

आरोपी पतीला ठोकल्या बेड्या

मंजुळा यांना तातडीने बेळगाव येथील 'बीआयएमएस' रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.