Crime News : देशाची राजधानी दिल्ली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका IRS अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीची मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. दक्षिण-पूर्व दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात बुधवारी (22 एप्रिल) सकाळी ही घटना घडली. तसेच या तरुणीवर लैंगिक अत्याचार आणि छळ झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
लैंगिक अत्याचार अन् हत्या
बुधवारी या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीचा मृतदेह तिच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मृत तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता असून, त्यानंतर मोबाईल चार्जिंग केबलने तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हे ही वाचा : कोल्हापूर : व्याजाच्या पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंध, नग्न व्हिडीओ शूट करुन महिलेवर 3 वर्ष अनन्वित अत्याचार
नोकरावर संशय
या प्रकरणात संशयाची सुई घरामध्ये पूर्वी घरकाम करणाऱ्या नोकराकडे वळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नोकराला सुमारे दीड महिन्यापूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आले होते. सूड घेण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती बुधवारी सकाळी पोलिसांना मिळाली, त्यानंतर पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
हे ही वाचा : मंडपातून नवरा गेला पळून, दिरांनी दिला नकार, चौथ्या नंबरच्या तरुणाला कसं तरी घोड्यावर चढवलं; मात्र सासऱ्याने घातला घोळ
इंजिनिअरिंगनंतर युपीएससीची तयारी
दिल्ली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती UPSC ची तयारी करत होती. ही घटना घडली तेव्हा तरुणीचे आई-वडील सकाळी जिममध्ये गेले होते. ज्या नोकरावर संशय व्यक्त केला जात आहे तो राजस्थानचा रहिवासी असून त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढण्यात आले होते.
सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT











