नाशिक: नाशिकमधील TCS या आयटी कंपनीतील प्रकरणात धक्कादायक गोष्टी सातत्यानं समोर येताना दिसत आहेत. आता याच प्रकरणातील एका पीडितेचे आरोप ऐकून आणि तिचे अनुभव ऐकून संताप आल्याशिवाय राहणार नाही. 'बुरखा घालत नाही म्हणून तुझ्या धर्मात बलात्कार होतात...' अशी भयंकर वाक्यं या पीडितेला ऐकावी लागली. शिवाय शारीरिक लगट, घाणेरडे प्रश्न, धार्मिक टीका देखील या पीडितेला तब्बल 9 महिन्यांपर्यंत सहन कराव्या लागल्या. या प्रकणातील पाचही आरोपींनी या पीडितेला कसं छळलं हे तिने स्वत: सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ही पीडिता जून 2025 मध्ये नाशिकमधील TCS कंपनीत असोसिएट पदावर रुजू झाली होती. तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि पती बाहेर राहत असल्याने ती एकटीच राहत होती. आरोपींनी याच गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि तिला प्रचंड छळलं.
यातला पहिला आरोपी– रजा मेमन जो टीम लीडर होता.
रजा मेमन हा लोन विभागाचा टीम लीडर होता. त्याचा या महिलेच्या ट्रेनिंगशी संबंध नसतानाही तो वारंवार ट्रेनिंग रूममध्ये यायचा. तो तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत असे, “पती बाहेर आहेत, एकटी कशी राहतेस?” अशा स्वरूपाचे डायलॉग मारायचा. त्याने महिलेला “प्लेयर” असं नाव देऊन ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर तिला हिणवायचा. मी तुझा पती असतो तर कधीच बाहेर गेलो नसतो असंही तो बोलायचा. गुढी पाडव्याच्या दिवशी, महिला साडी घालून आल्यावर रजा मेमननं तिच्या साडीचा पदर पकडला आणि अश्लील नजरेने तिच्याकडे पाहत तो हसत होता, असा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे.
हे ही वाचा>> बीड : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते.., सावत्र आई सवतीच्या मुलासोबत पळून गेली; पुढे काय घडलं?
दुसरा आरोपी – शाहरुख कुरेशी (ट्रेनर)
शाहरुख कुरेशी हा तिचा ट्रेनर होता. रजा मेमन जेव्हा अश्लील बोलत असे, तेव्हा तोही त्यात सहभागी होत असे आणि त्याला प्रोत्साहन द्यायचा. तोही तिच्या लग्नाबाबत आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अश्लील प्रश्न विचारत होता, असं पीडितेनं म्हटलं आहे.
तिसरा आरोपी – आसिफ अन्सारी. याच्यावर तर सर्वाधिक गंभीर आरोप पीडितेनं केले आहेत.
आसिफ अन्सारी हा वेगळ्या टीममध्ये असतानाही दररोज तिच्या डेस्कवर यायचा. त्याने वारंवार तिच्या शरीराला स्पर्श केला, हात पकडण्याचा प्रयत्न केला, तसेच जांघ, खांदा आणि कमरेवर हात ठेवला. तुझी झिरो फिगर आहे म्हणत एकदा तर त्याने मागून येऊन जबरदस्तीने तिला मिठी मारली होती. पीडितेनं कसंबसं स्वतःला सोडवून तिथून निघून गेली होती.
हे ही वाचा>> 36 वर्षीय लेकाने 70 वर्षीय आईचे हातपाय बांधून केलं लैंगिक शोषण, रात्रभर तिथेच... लाज आणणारा प्रकार
तो सतत अश्लील नजर ठेवायचा आणि अंडरगारमेंट्सविषयी प्रश्न विचारायचा. म्हणायचा नवरा नाहीये तर काहीही गरज असली तर मला सांग. दिवाळीच्या वेळी साडी घालून येण्याचं सांगत तू किती हॉट आणि सेक्सी आहेस हे मला बघायचंय असं त्यानं म्हटलेलं. त्यानंतर त्या पीडितेनं त्याला इंस्टाग्राम, लिंक्डइनवर अनफॉलो केलं. मात्र आसिफनं तिला छळणं सोडलंच नाही. बुरखा घालत नाही म्हणून तुझ्या धर्मात बलात्कार होतात.. अशी भयंकर वाक्य तो तिला बोलायचा. याशिवाय, त्याने धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्यं करत, हिंदू देवी-देवतांबद्दल अपमानास्पद बोलल्याचाही आरोप आहे.
जानेवारी 2026 मध्ये, मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा पीडिता साडी नेसून आली, तेव्हा त्याने तिच्या ब्लाउजविषयी अत्यंत घाणेरडे शब्द उच्चारले, असंही पीडितेनं सांगितलं आहे.
चौथा आरोपी – तौसीफ अत्तार
तौसीफ अत्तार हा देखील वेगळ्या टीममध्ये होता, पण तो रोज तिच्या डेस्कवर यायचा. काम शिकवण्याच्या बहाण्याने तो तिच्या खूप जवळ यायचा. गालाला गाल लावणे, खांद्यावर आणि हातावर स्पर्श करणे, जांघेवर हात ठेवणे असे प्रकार करत असल्याचा आरोप आहे. पीडितेनं विरोध केल्यावर त्याने “नोकरीत पुढे जायचं असेल तर असंच चालेल” असं म्हटलं असल्याचं पीडितेनं सांगितलं आहे.
पाचवा आरोपी – शफी शेख
शफी शेख याने देखील गुढी पाडव्याच्या दिवशी पीडितेभोवती फिरत अश्लील नजरेने पाहिल्याचा आरोप आहे.
आता प्रश्न असा पडतो की, एवढं संतापजनक आणि डोक्यात तिडीक जाणाऱ्या गोष्टी घडत असताना पीडीतेनं एवढे दिवस सहन का केलं? तर तिच्या मते, ती नवीन नोकरीत असल्यामुळे घाबरलेली होती. तक्रार केल्यास नोकरी जाईल या भीतीमुळे ती गप्प राहिली. याच भीतीचा फायदा घेत आरोपींनी तब्बल 9 महिने तिचा छळ सुरू ठेवला.
एकंदरीतच या आरोपींची मोडस ऑपरेंडी फारच भीषण होती. या प्रकरणात पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











