वेस्टर्न स्टाईल प्रपोज करतो म्हणाली अन् बेडवरच जिवंत जाळलं, शारीरिक संबंधानंतर प्रेयसीने प्रियकराला का संपवले?

मुंबई तक

22 Apr 2026 (अपडेटेड: 22 Apr 2026, 02:49 PM)

एका तरुणीने 'वेस्टर्न स्टाईल प्रपोज'च्या नावाखाली आपल्याच प्रियकराची निर्घृण हत्या केली. यामागे एक धक्कादायक कारण असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वेस्टर्न स्टाईल प्रपोज करतो म्हणाली अन् बेडवरच जीवंत जाळलं

point

शारीरिक संबंधानंतर प्रेयसीने का उचललं टोकाचं पाऊल?

Crime News : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलोरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणीने 'वेस्टर्न स्टाईल प्रपोज'च्या नावाखाली आपल्याच प्रियकराची निर्घृण हत्या केली. ही घटना बयादरहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनानगर परिसरात मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. किरण (27 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपली मैत्रीण प्रेमा हिच्या घरी गेला होता. 

हे वाचलं का?

विदेशी  स्टाईलमध्ये प्रपोज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी घरात दुसरे कोणीही नव्हते. यादरम्यान, तरुणीने किरणला सांगितले की ती त्याला 'विदेशी स्टाईल'मध्ये प्रपोज करणार आहे. त्यानंतर तिने दोरीने त्याचे हात-पाय बांधले आणि डोळ्यांवर पट्टी बांधली. जेव्हा किरणने याबद्दल विचारले, तेव्हा तरुणीने हा 'प्रपोजचाच एक भाग' असल्याचे सांगितले. या घटनेपूर्वी दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर तरुणीने आधीच तयार ठेवलेले रॉकेल किरणवर ओतले आणि त्याला आग लावून दिली, ज्यामुळे त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

हे ही वाचा : Viral Video: 'F&%$ #%...' महिलांसाठी रस्त्यावर उतरलेल्या महायुतीच्या मोर्च्यावर 'ती' महिला संतापली, शिवीगाळ अन्...

प्रेयसीकडे दुर्लक्ष केले

पोलीस तपासात समोर आले आहे की, आरोपी तरुणी आणि मृत किरण दोघेही एका टेलिकॉम कंपनीत काम करत होते आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले होते. प्राथमिक तपासानुसार, किरण गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय तरुणीला होता, ज्याच्या रागातून तिने हे भयानक पाऊल उचलले. इतकेच नाही तर आरोपीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या मोबाईल फोनमध्ये केले असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

हे ही वाचा : शेजाऱ्याने चिमुकलीसमोर तिच्या आई-बापाला संपवलं, गळा चिरुन क्रूरपणे हत्या; नेमकं कारण काय?

पोलिसांनी काय सांगितले?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. याप्रकरणी तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी केली जात आहे. या संदर्भात उत्तर-पश्चिम विभागाचे डीसीपी डीएल नागेश यांनी सांगितले की, हे स्पष्टपणे हत्येचे प्रकरण असून सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.