Viral Video: 'F&%$ #%...' महिलांसाठी रस्त्यावर उतरलेल्या महायुतीच्या मोर्च्यावर 'ती' महिला संतापली, शिवीगाळ अन्...
वरळीत महायुती महिला आक्रोश मोर्च्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ज्यामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने आंदोलनकर्त्यांवर संताप व्यक्त करत थेट त्यांना अपशब्द वापरले.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या महिला आघाडीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे आज (21 एप्रिल) दुपारपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत एका तासापासून अडकलेल्या एका सामान्य महिलाने आंदोलनस्थळी धाव घेऊन प्रचंड गोंधळ घातला. संतापाच्या भरात तिने आंदोलन करणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली, पोलिसांना जाब विचारला आणि “बाजूच्या मैदानात आंदोलन करा, रस्त्यावर नाही!” असा आग्रह धरला. या घटनेमुळे मोर्च्याच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नेमकं काय घडलं?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या महिला आघाडीने आज सकाळपासून वरळीतील एका प्रमुख रस्त्यावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला होता. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत संमत न झाल्याने महायुतीच्या महिला आघाडीने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांविरोधात हा मोर्चा काढला होता. मात्र या मोर्च्यामुळे वरळी आणि आसपासच्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. दुपारी एक वाजता जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
हे ही वाचा>> पंतप्रधान मोदी LIVE: संबोधनाच्या सुरुवातीलाच मोदी संतापले, 'या' विषयावरून प्रचंड चिडले!
याच वेळी एका चारचाकी वाहनातून प्रवास करणारी एक महिला ही या कोंडीत अडकली होती. मात्र तासाभरापासून ट्रॅफिक जाम असल्याने महिलेला संताप अनावर झाला. ती आपली कार सोडून थेट मोर्च्यात सहभागी झालेल्या महिलांकडे धाव घेतली. “एक तासापासून इथे अडकले आहे. तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर बाजूच्या मैदानात बसा! आमच्या रोजच्या आयुष्यात अडथळा आणू नका!” अशा शब्दांत तिने आंदोलनकर्त्यांवर तोंडसुख घेतले.
संतापाच्या भरात तिने काही आंदोलनकर्त्या महिलांना शिवीगाळही केली. तसेच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तिने थेट जाब विचारला. “तुम्ही काय करताय? लोकांच्या रोजगाराला, मुलांच्या शाळेला अडथळा होत आहे, तरीही तुम्ही आंदोलन चालू ठेवताय? रस्ता खाली करा!” असे म्हणत तिने पोलिसांनाही धारेवर धरले.









