मंडपातून नवरा गेला पळून, दिरांनी दिला नकार, चौथ्या नंबरच्या तरुणाला कसं तरी घोड्यावर चढवलं; मात्र सासऱ्याने घातला घोळ
viral news : देहात कोतवाली परिसरातील एका गावात, 22 ऑगस्ट 2025 रोजी कछवा पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाचा साखरपुडा झाला होता. लग्नाची तारीख 20 एप्रिल 2026 ठरली होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, पण आनंदाच्या वातावरणात लग्नाच्या मंडपातून नवरदेव अचानक पळून गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दबावाखाली चौथ्या मुलाची लग्नाची वरात
दुसर्याच दिवशी सकाळी मोठं नाट्य
Viral News : उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. देहात कोतवाली परिसरातील एका गावात, 22 ऑगस्ट 2025 रोजी कछवा पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाचा साखरपुडा झाला होता. लग्नाची तारीख 20 एप्रिल 2026 ठरली होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, पण आनंदाच्या वातावरणात लग्नाच्या मंडपातून नवरदेव अचानक पळून गेला.
हे ही वाचा : वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या 'त्या' महिलेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?
दबावाखाली चौथ्या मुलाची लग्नाची वरात
मुलाच्या वडिलांनी 19 एप्रिल रोजी मुलीच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, बदनामी आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीने, मुलाच्या वडिलांनी अखेरीस आपल्या सर्वात लहान म्हणजे चौथ्या नंबरच्या मुलाची लग्नासाठी समजूत घातली आणि त्याला घोड्यावर बसवलं. 20 एप्रिल रोजी, वरात मोठ्या थाटामाटात मुलीच्या घरी पोहोचली. चौथ्या मुलाचा विवाह पार पडला, त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना वाटले की, आता कसलीही चिंता नाही, मुलीचा विवाह होऊन चिंता मिटणार.
दुसर्याच दिवशी सकाळी मोठं नाट्य
दुसर्याच दिवशी सकाळी मोठं नाट्य सुरू झालं. वधूचे कुटुंबीय त्या ठिकाणी दाखल झाले, जिथे वरात निरोप देण्याच्या कार्यक्रमासाठी थांबली होती. मात्र, नवरा मुलगा तिथे आल्यानंतरच निरोप समारंभ होईल. त्यांनी असा युक्तीवाद केला की, तोच खरा लग्नासाठी वारसदार आहे आणि तो सापडल्यानंतर डोली उचलली जाईल.
हे ही वाचा : आजपासून 'या' राशींचे नशीब उजळणार, शनिदेवामुळे आर्थिक लाभ मिळणार
भव्य लग्नसोहळा होऊनही, मुलगी माहेरी राहिली आहे. नवरदेवाचे कुटुंबीय तिला सोबत नेत नाहीत आणि कोणतीही स्पष्टपणे उत्तरं दिली नाहीत. कुटुंबीय आपल्या तरुणीचे हक्क मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात धाव घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भ्र शब्द काढला नाही. तसेच हा विवाहसोहळा चर्चेचा विषय बनला आहे.









