'सणाला साडी नेसली की पदर धरायचे, ब्लाऊजविषयी तर खूपच...', TCS मधील आरोपींचे अत्यंत घाणेरेडे चाळे

निलेश झालटे

नाशिकमधील TCS प्रकरणी पीडित महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामध्ये आरोपी कशाप्रकारे महिलेला त्रास द्यायचे हे आता समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

tcs case rapes occur in your religion because you dont wear a burqa victim makes grave allegations describing how 5 accused tormented her
TCS मधील आरोपींचे अत्यंत घाणेरेडे चाळे
google news

नाशिक: नाशिकमधील TCS या आयटी कंपनीतील प्रकरणात धक्कादायक गोष्टी सातत्यानं समोर येताना दिसत आहेत.  आता याच प्रकरणातील एका पीडितेचे आरोप ऐकून आणि तिचे अनुभव ऐकून संताप आल्याशिवाय राहणार नाही. 'बुरखा घालत नाही म्हणून तुझ्या धर्मात बलात्कार होतात...' अशी भयंकर वाक्यं या पीडितेला ऐकावी लागली. शिवाय शारीरिक लगट, घाणेरडे प्रश्न, धार्मिक टीका देखील या पीडितेला तब्बल 9 महिन्यांपर्यंत सहन कराव्या लागल्या. या प्रकणातील पाचही आरोपींनी या पीडितेला कसं छळलं हे तिने स्वत: सांगितलं आहे. 

ही पीडिता जून 2025 मध्ये नाशिकमधील TCS कंपनीत असोसिएट पदावर रुजू झाली होती. तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि पती बाहेर राहत असल्याने ती एकटीच राहत होती. आरोपींनी याच गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि तिला प्रचंड छळलं.

यातला पहिला आरोपी– रजा मेमन जो टीम लीडर होता.

रजा मेमन हा लोन विभागाचा टीम लीडर होता. त्याचा या महिलेच्या ट्रेनिंगशी संबंध नसतानाही तो वारंवार ट्रेनिंग रूममध्ये यायचा. तो तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत असे, “पती बाहेर आहेत, एकटी कशी राहतेस?” अशा स्वरूपाचे डायलॉग मारायचा. त्याने महिलेला “प्लेयर” असं नाव देऊन ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर तिला हिणवायचा. मी तुझा पती असतो तर कधीच बाहेर गेलो नसतो असंही तो बोलायचा. गुढी पाडव्याच्या दिवशी, महिला साडी घालून आल्यावर रजा मेमननं तिच्या साडीचा पदर पकडला आणि अश्लील नजरेने तिच्याकडे पाहत तो हसत होता, असा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे.

हे ही वाचा>> बीड : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते.., सावत्र आई सवतीच्या मुलासोबत पळून गेली; पुढे काय घडलं?

दुसरा आरोपी – शाहरुख कुरेशी (ट्रेनर)

शाहरुख कुरेशी हा तिचा ट्रेनर होता. रजा मेमन जेव्हा अश्लील बोलत असे, तेव्हा तोही त्यात सहभागी होत असे आणि त्याला प्रोत्साहन द्यायचा. तोही तिच्या लग्नाबाबत आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अश्लील प्रश्न विचारत होता, असं पीडितेनं म्हटलं आहे.

हे वाचलं का?