काका कामासाठी पुण्यात, तिकडं पुतण्याचं काकीसोबत सूत जुळलं, सगळं उघडं होताच दोघांचा टोकाचा निर्णय

मुंबई तक

crime news : काकी आणि पुतण्यामधील अनैतिक प्रेमसंबंधातून दोघांनीही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती कामासाठी बाहेर गावी असताना सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणाने आता हिंसक वळण घेतले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

काका कामासाठी पुण्यात, तिकडं पुतण्याचं काकीसोबत सूत जुळलं

point

सगळं उघडं होताच दोघांचा टोकाचा निर्णय

Crime News : एका 25 वर्षीय काकीचे तिच्याच 17 वर्षांच्या सख्ख्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध जुळले असून, या नात्याचा अंत अत्यंत भीषण आणि आत्मघाती वळणावर झाला आहे. या प्रकरणाची मुळं डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या एका विवाहाशी जोडलेली आहेत. विनोद (नाव बदललेले आहे) नावाच्या तरुणाचा विवाह नेहा (नाव बदललेले आहे) नावाच्या तरुणीशी झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच विनोद उदरनिर्वाहासाठी पुण्याला कामाला गेला. पतीच्या अनुपस्थितीत घरात एकट्या असलेल्या नेहाचे तिच्या 17 वर्षीय पुतण्याशी सूत जुळले आणि पाहता पाहता या ओळखीचे रूपांतर एका गंभीर प्रेमप्रकरणात झाले. बिहार राज्यातील गोपाळगंज जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या भोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही खळबळजनक घटना समोर आली आहे.

पतीची पुण्यातून घरवापसी आणि हिंसक वळण

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या छुप्या प्रेमप्रकरणाची भनक जेव्हा घरातील इतर सदस्यांना लागली, तेव्हा कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नातेवाईकांनी तातडीने बिनोदला पुण्याहून परत बोलावले. 16 एप्रिल रोजी बिनोद आपल्या गावी पोहोचताच घरातील तणाव शिगेला पोहोचला. ज्या पतीला सोडून पत्नीने पुतण्याशी नाते जोडले होते, तो पती समोर आल्याने पुतण्या विजयच्या मनात ईर्ष्या आणि नैराश्य निर्माण झाले. आपल्या काका आणि काकीला एकत्र पाहून त्याने सुरुवातीला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कुटुंबीयांनी सतर्कता दाखवत त्याला वाचवले. मात्र, या घटनेने घरातील वातावरण अधिकच गंभीर बनले आणि समाजात या अनैतिक नात्याची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा : वेस्टर्न स्टाईल प्रपोज करतो म्हणाली अन् बेडवरच जीवंत जाळलं, शारीरिक संबंधानंतर प्रेयसीने प्रियकराला का संपवले?

रुग्णालयात मृत्यूशी झुंज आणि लग्नासाठी घातलेला अट्टाहास

या वादाचा शेवट अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाला. समाजातील बदनामी आणि एकमेकांपासून वेगळं होण्याच्या भीतीने नेहाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या प्रेयसीने विष घेतल्याचे समजताच प्रियकर पुतण्यानेही मागे न राहता तेच विषारी पदार्थ खाल्ला. सध्या या दोघांनाही अत्यंत गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते तिथे मृत्यूशी झुंज देत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूच्या दारात असूनही हे दोघे एकमेकांसोबत राहण्याच्या आणि लग्न करण्याच्या जिद्दीवर ठाम आहेत. या अमानवीय आणि अनैतिक कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नात्यांच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?