Maharashtra Weather : उष्णतेची लाट, कुठे वादळी वारा तर कुठे गारा; 26 जिल्ह्यांचं अवघड

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढला आहे, तसेच काही ठिकाणी पावसाने थैमान घातलं आहे. 21 एप्रिल 2026 रोजी राज्यावर दुहेरी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह विजांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज जारी केला आहे. अशातच 26 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यावर पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढला

point

21 एप्रिल 2026 रोजी राज्यावर दुहेरी संकट निर्माण होण्याची शक्यता

Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढला आहे, तसेच काही ठिकाणी पावसाने थैमान घातलं आहे. 21 एप्रिल 2026 रोजी राज्यावर दुहेरी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह विजांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज जारी केला आहे. 20 एप्रिल रोजी हवामान विभागाने काही ठिकाणी गारांचा पाऊस पडेस असा अंदाज जारी केला होता. अशातच 26 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा :  पुण्याची गोष्ट : पुणेकरांनो हित साधून घ्या, मेट्रो 2 ची प्रतिक्षा लवकरच संपणार, महत्त्वाची अपडेट समोर

कोकण 

कोकण विभागात वादळी पावसाची शक्यता जारी केले. मुंबईसह ठाणे परिसरात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला. तसेच या विभागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवेल.  

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. पुढील काही तास वाऱ्यांसह पावसाचा सतर्कतेचा इशारा जारी केला. 

मराठवाडा 

मराठवाडा या विभागात अवकाळी पावसाचा अंदाज जारी केला. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तसेच काही अंशी ठिकाणी तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. 20-24 एप्रिल दरम्यान पावसाची वादळी स्थिती कायम राहील असा अंदाज आहे. 

हे वाचलं का?