Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट, 24 जिल्ह्यांचं खरं नाही, महत्त्वाचा अलर्ट
maharashtra weather : राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला, जाणून घेऊयात 21 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील हवामानात लक्षणीय बदल
तब्बल 24 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट
21 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होताना दिसतोय. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला, जाणून घेऊयात 21 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट.
हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध, नवऱ्याला सहन झालं नाही, तरुणावर चाकूने सपासप केले वार अन्... भयंकर कांड
कोकण
कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जारी केला. तसेच किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग वाढू अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता असून काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची अधिक शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांत दुपारनंतर वातावरणात बदल जाणवेल. या भागातील तापमानात घट निर्माण होऊन उष्णतेची तीव्रता कमी होईल, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. तसेच काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.









