Kalyan Crime : कल्याणच्या टिटवाळा येथे नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर मुंबईत नशेच्या पदार्थांविरोधात अभियान सुरु केलं आहे. ज्यात एक मोठं ड्रग्ज रॅकेट समोर आलेलं आहे. टिटवाळाच्या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या एका घरातून तब्बल 6 कोटी रुपयांचे 5 हजार एक्स्टसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी ए. पॉल नावाच्या एका बार डान्सर महिलेला अटक केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 36 वर्षीय लेकाने 70 वर्षीय आईचे हातपाय बांधून केलं लैंगिक शोषण, रात्रभर तिथेच... लाज आणणारा प्रकार
200 एक्स्टेसी गोळ्या ताब्यात घेत आरोपी इरफान अंसारी अटकेत
ही कारवाई साकीनाका परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या छाप्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी सर्वात आधी 200 एक्स्टेसी गोळ्या ताब्यात घेत आरोपी इरफान अंसारीला अटक केली. तपासादरम्यान, सुफियान नावाच्या एका व्यक्तीचे नाव समोर आले, जे या रॅकेटशी अगदीच जवळचे होते. अशातच पोलीस पॉलपर्यंत पोहोचली होती.
छाप्यादरम्यान घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा आढळला
पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळेच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने सलग तीन दिवसांपर्यंत तांत्रिकदृष्ट्या आणि लोकेशन ट्रॅक करून माहिती मिळवली. अशातच पोलीस पथक टिटवाळास्थित असलेल्या एका कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचली, तेव्हा शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्यावर पोलीसही थक्क झाले.
आंतरराष्ट्रीय सप्लाई नेटवर्कबाबत संशय वाढला
पोलीस आपला पाठलाग करू शकत नाही असा पाॅलचा चुकीचा समज होता, हे पाहून विश्वासाने पॉलने तिच्याकडील अमली पदार्थांचा संपूर्ण साठा घरातच लपवून ठेवला होता. जप्त केलेल्या एक्स्टसीच्या गोळ्यांवर मर्सिडीजचा लोगो आणि डॉलरचे चिन्ह होते. विशेष, अशी चिन्हे असलेल्या गोळ्या याआधी नेस्को प्रकरणात आढळून आल्या होत्या, ज्यात आंतरराष्ट्रीय सप्लाई नेटवर्कबाबत संशय अधिक वाढला.
पोलिसांनी पॉलच्या ताब्यातून 4 ते 5 मोबाईल फोन आणि 7 ते 8 सिम कार्डदेखील जप्त केले. अमली पदार्थाच्या पुरवठ्यासाठी ती तात्पुरत्या स्वरुपात विविध फोन नंबर वापरत असे. पोलीस सध्या तिच्या मोबाईल डेटाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : लग्न समारंभात काकाने 6 वर्षाच्या पुतणीचे केले लैंगिक शोषण, गुप्तांगातून वाहू लागलं रक्त, आईनं पाहताच...
पॉल डान्स बारमध्ये काम करायची
संबंधित तपासातून असे समोर आले की, पॉल ही आधी डान्स बारमध्ये काम करत होती, नंतर ती मोठी ड्रग्स सप्लायर्स बनली. तिने दोन विवाह केलीत, तिचा एक नवरा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी एकाला अटक होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











