बंद रुम, निळा ड्रम आणि वाहणारं रक्त..11 वर्षीय मुलासोबत काय घडलं? आईच्या प्रेमसंबंधांवर बोलण्यास पोलिसांचा नकार

सुरज हा नुकताच पाचवी उत्तीर्ण होऊन नव्या उमेदीने सहावीत प्रवेश घेणार होता, मात्र त्याआधीच एका माथेफिरूने त्याचे जीवन संपवले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 11:13 AM • 22 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बंद रुम, निळा ड्रम आणि वाहणारं रक्त..

point

11 वर्षीय मुलासोबत काय घडलं?

point

आईच्या प्रेमसंबंधांवर बोलण्यास पोलिसांचा नकार

Crime News : मध्यप्रदेशातील सतना येथे माणुसकीला लाजवणारी एक घटना समोर आली असून, यामुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. बँक कॉलनीतील एका भाड्याच्या घरात 11 वर्षांचा निष्पाप बालक सुरज (उर्फ बादल) याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत विळ्याने सुरजचा गळा कापला. ओळख लपवण्यासाठी त्याने बालकाचा मृतदेह घरातील एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरला आणि वरून कपडे कोंबले.

हे वाचलं का?

या घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा बालकाची आई आणि बहीण कामावरून घरी परतल्या आणि बराच शोध घेऊनही मुलगा सापडला नाही. घराला कुलूप असूनही आतून कुलरचा आवाज येत असल्याने नातेवाईकांना काहीतरी अघटीत घडल्याची शंका आली. पोलिसांच्या उपस्थितीत जेव्हा कुलूप तोडण्यात आले, तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला. घराच्या भिंतींवर आणि उशीवर रक्ताचे शिंतोडे उडालेले होते आणि ड्रममधून वाहणाऱ्या रक्ताने सगळेच जण हादरुन गेले.

सुरज हा नुकताच पाचवी उत्तीर्ण होऊन नव्या उमेदीने सहावीत प्रवेश घेणार होता, मात्र त्याआधीच एका माथेफिरूने त्याचे जीवन संपवले. या हत्याकांडातील मुख्य संशयित मथुरा रजक असल्याचे सांगितले जात असून, तो जवळच इस्त्रीचे दुकान चालवतो. मथुरा हा मृतकाच्या आईवर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होता आणि तिने नकार दिल्याने त्याने रागातून निष्पाप मुलाला लक्ष्य केले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

घराला कुलूप मात्र लाईट, कुलर सुरुच

घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याच्या शोधात तीन वेगवेगळ्या पथकांद्वारे छापे टाकत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या एफएसएल पथकाने पुरावे गोळा केले असून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे पीडित कुटुंबाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाने आता सतना येथील सुरक्षा व्यवस्था आणि समाजाच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मृतकाची आई आशा यांनी सांगितले की, जेव्हा त्या कामावरून परतल्या तेव्हा घराला कुलूप होते, पण आत दिवे आणि कुलर सुरू होता. त्यांनी मुलगा बादलचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी मुलगी आणि शेजारील लोकांशी विचारपूस केली, पण कोणालाच काही माहिती नव्हती.

हे ही वाचा : मातोश्रीवर विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी 4 नेत्यांचं लॉबिंग, पण काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर ठेवली 'ती' अट

उशीवर रक्ताचे डाग

मथुरा रजक, जो अनेकदा रागात असायचा, त्यानेच मुलाला कुठे नेले असावे, असा संशय महिलेला आला. त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांसह घराचे कुलूप तोडले असता सुरुवातीला काही संशयास्पद आढळले नाही, पण नंतर त्यांची नजर रक्ताचे डाग असलेल्या एका उशीवर पडली. पीडितेने सांगितले की आरोपीचे दुकान नेहमी सुरू असायचे, पण आज ते बंद होते. मृतकाची बहीण सेजल रजक हिने सांगितले की, ती सकाळी 11 वाजता कामासाठी घराबाहेर पडली होती आणि तिची आई सकाळी 6 वाजताच कामावर गेली होती. दुपारी 12.30 च्या सुमारास आईचा फोन आला की ती घरी पोहोचली आहे, पण घराला कुलूप असून बादल कुठेही दिसत नाहीये.

हे ही वाचा : मंगळ करणार महापरिवर्तन, मे महिन्यात 'या' चार राशींच्या नशीबात राजयोग; तुमच्या नशीबात काय?

विळ्याने चिरला गळा

बहिणीला आधी वाटले की तो गच्चीवर खेळत असेल, पण बराच वेळ माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी कुलूप तोडले असता घराच्या आत एका ड्रममध्ये मुलाचा मृतदेह आढळला. कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह ड्रममध्ये टाकून त्यावर कपडे ठेवले होते. बहिणीच्या सांगण्यानुसार, आरोपीने विळ्याने सुरजचा गळा चिरला होता. आरोपी मथुरा रजक त्यांच्या आईशी जबरदस्तीने लग्न करू इच्छित होता आणि आईने नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात हे हत्याकांड केले.

हे ही वाचा : वेस्टर्न स्टाईल प्रपोज करतो म्हणाली अन् बेडवरच जीवंत जाळलं, शारीरिक संबंधानंतर प्रेयसीने प्रियकराला का संपवले?

प्रेमप्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार

घटनास्थळी एफएसएल पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांनी प्रथमदर्शनी ही हत्येची घटना असल्याचे मानले आहे. संशयितांना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना झाली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे. नातेवाईकांचे सविस्तर जबाब आणि पुराव्यांच्या आधारेच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रेमप्रकरण किंवा अन्य कोणत्याही वादाबाबत त्यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून तपास पूर्ण झाल्यावरच परिस्थिती स्पष्ट होईल असे म्हटले आहे.