लग्न समारंभात काकाने 6 वर्षाच्या पुतणीचे केले लैंगिक शोषण, गुप्तांगातून वाहू लागलं रक्त, आईनं पाहताच...

crime news : लग्नासाठी गेलेल्या एका सहा वर्षाच्या मुलीवर काकाने झोपेतच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घटनेदरम्यान पीडितेनं आरडाओरड देखील केली. मुलीच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याचे पाहून आईने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एफआरआय नोंदवला.

crime news

crime news

मुंबई तक

• 02:53 PM • 21 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नात सहा वर्षाच्या मुलीसोबत नको तेच...

point

काका मुलीच्या जवळ जाऊन झोपला अन् गुप्तांगाला स्पर्श करून...

point

लाज आणणारी घटना

Crime News : उत्तर प्रदेशच्या खुदगंज येथे लग्नासाठी गेलेल्या एका सहा वर्षाच्या मुलीवर काकाने झोपेतच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घटनेदरम्यान पीडितेनं आरडाओरड देखील केली. मुलीच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याचे पाहून आईने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एफआरआय नोंदवला, नंतर त्याला अटक करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  36 वर्षीय लेकाने 70 वर्षीय आईचे हातपाय बांधून केलं लैंगिक शोषण, रात्रभर तिथेच... लाज आणणारा प्रकार

लग्नात सहा वर्षाच्या मुलीसोबत नको तेच...

मऊ जिल्ह्यातील मधुवन भागातील एका महिलेनं सांगितलं की, तिची बहीण खुडगंज भागातील गावातील रहिवासी आहे. ती तिच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत तिच्या दीराच्या लग्नाला आली होती. तिच्या माहितीनुसार, ती नातेवाईकांकडे गेली असता, तिने आपल्या मुलीला एका खोलीत झोपवले होते. त्याचक्षणी अनेक लोक त्या खोलीबाहबेरच होते. 

आरोपी काका मुलीच्या जवळ जाऊन झोपला अन् गुप्तांगाला स्पर्श करून...

अशातच आरोपी हा मुलीच्या जवळ जाऊन झोपला, त्याने तिच्या गुप्तांगाला स्पर्श केला आणि तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेनं आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान महिला आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. पीडितेनं आईला घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. आईने गुप्तांगातील रक्त पाहिले तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. 

हे ही वाचा :  आई..,चिमुकल्यांचा काय दोष होता गं? 25 वर्षीय विवाहितेने काय केलं, संपूर्ण कुटुंब उद्धवस्त

असं हैवानी कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी 112 क्रमांकावरून पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. अशातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.