निष्पाप चेहऱ्यामागे थंड डोकं आणि 'तो'.., ऊसाचा रस.., स्पीकरच्या तारा; सगळं उद्धवस्त

मुंबई तक

21 Apr 2026 (अपडेटेड: 21 Apr 2026, 11:27 AM)

Crime News : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली असून इन्स्टाग्राम चॅटिंगमुळे या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला आहे.पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या असून हत्येसाठी अमावस्येच्या रात्रीचा वापर करण्यात आला होता.

wife kills husband

wife kills husband

Google CTA

बातम्या हायलाइट

point

निष्पाप चेहऱ्यामागे थंड डोकं आणि 'तो'

point

ऊसाचा रस.., स्पीकरच्या तारा; सगळं उद्धवस्त

Crime News : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातून प्रेम आणि फसवणुकीतून एका सुखी कुटुंबाचा अंत करणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी या प्रकरणातील हत्येची गुढ यशस्वीरीत्या उकलले आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 22 वर्षीय मनीष जांगू असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे लग्न काही वर्षांपूर्वी बीकानेरच्या निकितासोबत झाले होते. निकिताचे मुकलावा (गोना) होऊन अवघे काही महिने उलटले असतानाच, तिने आपल्या पतीचा बळी घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेने सर्वांचेच मन सुन्न केले आहे.

हे वाचलं का?

महिनाभराचे नियोजन आणि अमावस्येच्या रात्री कृत्य

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, निकिताचे तिचे शेजारील गावातील धर्माराम कस्वा या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनाही एकत्र राहायचे होते, मात्र निकिताचा पती मनीष त्यांच्या मार्गात अडथळा ठरत होता. त्यामुळेच निकिता आणि धर्माराम यांनी मनीषला कायमचे संपवण्यासाठी महिनाभरापूर्वीच एक भीषण कट रचला होता. या हत्येसाठी त्यांनी अमावस्येचा दिवस निवडला, जेणेकरून अंधाराचा फायदा घेता येईल. ठरल्याप्रमाणे धर्मारामने मनीषला एका बहाण्याने आपल्या गाडीत बसवून नेले. प्रवासादरम्यान धर्मारामने मनीषला ऊसाच्या रसात गुंगीचे औषध (सल्फास) मिसळून दिले. मनीष बेशुद्ध होताच धर्मारामने कारमधील स्पीकरच्या तारांनी त्याचा गळा आवळून त्याला मृत्यूच्या स्वाधीन केले आणि त्याचा मृतदेह एका निर्जन रस्त्यावर फेकून दिला.

सोशल मीडियामुळे उलगडला कटाचा भाग

सुरुवातीला ही घटना एक सामान्य अपघात असल्याचे भासले होते, मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मनीषची पत्नी निकिताच्या संशयास्पद वागणुकीमुळे पोलिसांना शंका आली. नागौर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि निकितासह धर्मारामच्या मोबाईल फोनची बारकाईने तपासणी केली. यादरम्यान निकिता आणि धर्माराम यांच्यात इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेले संभाषण पोलिसांच्या हाती लागले. या चॅटिंगने संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला, ज्यामध्ये हत्येचे नियोजन आणि एकमेकांसोबत राहण्याच्या चर्चांचा स्पष्ट उल्लेख होता. या डिजिटल पुराव्यामुळे पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

नागौर पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत आरोपी पत्नी निकिता आणि तिचा प्रियकर धर्माराम यांना बेड्या ठोकल्या असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. एका तरुणाचा आयुष्याचा शेवट केवळ अनैतिक संबंधांच्या हव्यासापोटी त्याच्याच जवळच्या व्यक्तीने केल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलीस आता या प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत, जेणेकरून न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देता येईल. अशा अमानवीय कृत्यामुळे समाजात संताप व्यक्त केला जात असून, सोशल मीडियाच्या गैरवापरातून घडणाऱ्या अशा गुन्ह्यांनी पोलिसांसमोर नवीन आव्हाने उभी केली आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर परिसरात शांतता प्रस्थापित झाली असली तरी या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट, 24 जिल्ह्यांचं खरं नाही, महत्त्वाचा अलर्ट