मालेगाव: मालेगाव ज्या बॉम्बस्फोटांनी हादरुन गेलेलं, 31 लोकांचा यात मृत्यू झालेला तर शेकडो जण जखमी झालेले. या प्रकरणात आता 20 वर्षांनंतर मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील शेवटच्या 4 हिंदू आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. मनोहर नरवारिया, राजेंद्र चौधरी, धनसिंग आणि लोकेश शर्मा, अशी निर्दोष मुक्तता झालेल्या शेवटच्या चार आरोपींची नावे आहेत. आता या आरोपींच्या सुटकेनंतर या खटल्याला सामोरे जाणारा एकही संशयित किंवा आरोपी उरलेला नाही. 2006 साली झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात सुमारे 31 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले होते तर 312 जण जखमी झाले होते.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणात सुरुवातीला 9 मुस्लिम व्यक्तींना अटक करण्यात आली होती. मात्र, 2016 मध्ये त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर आता हिंदू आरोपींचीही सुटका झाल्याने नेमका बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे. आधी ATS नंतर CBI आणि नंतर NIA अशा तीन बड्या यंत्रणांनी तपास करुनही मृतांच्या नातलगांना न्याय मिळालेला नाही.
हे ही वाचा>> खोलीत 16 तरुणी आणि 7 पुरुष, पोलिसांनी धाड मारत सेक्स रॅकेटचा केला भांडाफोड... रेड लाईट भागात भयंकर घडलं
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकीलांनी जोरदार प्रतिवाद केला. NIA ने ज्याचा संदर्भ दिला आहे, असा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अस्तित्वात नाही, ज्याने स्वतःला प्रत्यक्षदर्शी म्हणून दावा केला असेल, असा दावा वकील गिरीश कुलकर्णी आणि कौशिक म्हात्रे यांनी केला.
दरम्यान, NIA च्या वतीने बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) अनिल सिंह यांनी न्यायालयाला एक तक्ता सादर केला. या तक्त्याद्वारे त्यांनी असे दर्शविले की, नरवारिया आणि इतर आरोपींविरोधातील दोषारोपपत्राला पुष्टी देण्यासाठी NIA ने काही अतिरिक्त कागदपत्रांची आणि आणखी काही साक्षीदारांची तपासणी केली आहे. न्यायालयाने विचारणा केली असता, NIA चे पोलीस निरीक्षक संदीप साळवे यांनी या प्रकरणांमध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला.
हे ही वाचा>> Rahuri Bypoll Survey: एक फोन किंगमेकर! पण राहुरीतली टशन संपलेली नाही, तसं झालं तर गेम फिरणार!
मागच्या वर्षी 31 जुलैला 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावात झालेल्या आणखी एका बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. आता या खटल्यातही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
ADVERTISEMENT











