खोलीत 16 तरुणी आणि 7 पुरुष, पोलिसांनी धाड मारत सेक्स रॅकेटचा केला भांडाफोड... रेड लाईट भागात भयंकर घडलं

मुंबई तक

Crime news : पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्याची माहिती समोर आली. देह विक्रीचा व्यापार सुरु असलेल्या एका खोलीत पोलिसांनी धाड मारत 7 पुरुष आणि 16 महिलांना पकडले. पूर्णिया जिल्ह्यातील गुलाबबाग जीरोमाइड रोड लाईट भागात पोलिसांनी छापेमारी केली होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

खोलीचे कुलूप तोडून 16 महिला 7 पुरुष...

point

रेड लाईट भागात पोलिसांची धाड 

Crime news : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्याची माहिती समोर आली. देह विक्रीचा व्यापार सुरु असलेल्या एका खोलीत पोलिसांनी धाड मारत 7 पुरुष आणि 16 महिलांना पकडले. पूर्णिया जिल्ह्यातील गुलाबबाग जीरोमाइड रेड लाईट भागात पोलिसांनी छापेमारी केली होती. तीन तासांच्या छापेमारीतून मुलींना देह विक्रीच्या व्यापारातून मुक्त केले. 

हे ही वाचा : क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर सतत ब्लॅकमेल केलं... लाज आणणारी घटना

सांगण्यात येतंय की, दीक्षित श्वेतम आणि सदर वन विभागाचे एसडीपीओ ज्योती शंकर यांच्या नेतृत्वातखाली, एका स्वयंसेवी संस्थेसह स्थानिक पोलीस ठाण्यातील आणि इतर विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी छापा टाकला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं. 

खोलीचे कुलूप तोडून 16 महिला 7 पुरुष...

पथकाने सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले, नंतर खोलीचे कुलूप तोडून 16 महिला 7 पुरुषांना ताब्यात घेतले. यासोबतच, त्याच्या तावडीतून इतर 3 अल्पवयीन मुलांची सुटका केली. संबंधित माहितीनुसार, एका स्वयंसेवी संस्थेला झेरोमोईल येथे अवैध वैश्याव्यवसायाचा बाजार असल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. 

रेड लाईट भागात पोलिसांची धाड 

एसडीओ आणि वन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. रेड लाईट भागात छापा टाकण्यासाठी एक योजना आखली. नंतर ठरलेल्या योजनेनुसार दुपारी 3 वाजता त्या रेड लाईट भागात पोलिसांनी छापा टाकला आणि एकूण 23 जणांना ताब्यात घेतलं. 

हे वाचलं का?