पुणे: लग्न जुळत नसल्याने तरुणाने पोलीस असल्याचा केला खोटा दावा, शहरभर अभिनंदनाची बॅनरबाजी; पितळ उघडं पडलं
Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाचे लग्न जमत नसल्याने आपण स्वत: एक पोलीस अधिकारी असल्याचे भासवत खोटा दावा केला. या घटनेनं नऱ्हे परिसर हादरून गेला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे, संबंधित प्रकरणातील आरोपीची ओळख पटली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाचा पुणे पोलीस शहर विभागात निवड झाल्याचा खोटा बनाव
बनावाचे पितळ उघडं पडलं
Pune Crime : आदित्य भावार - पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाचे लग्न जमत नसल्याने आपण स्वत: एक पोलीस अधिकारी असल्याचे भासवत खोटा दावा केला. या घटनेनं नऱ्हे परिसर हादरून गेला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आपण पोलीस अधिकारी असल्याचा खोटा बनाव रचणाऱ्या तरुणाचे नाव ऋषिकेश राजू जाधव (वय 26) असे आहे.
हे ही वाचा : बार डान्सर निघाली 'ड्रग्स क्वीन', आलिशान घरात सापडल्या 'त्या' गोळ्या अन्...
तरुणाचा पुणे पोलीस शहर विभागात निवड झाल्याचा खोटा बनाव
ऋषिकेशने आपली पुणे पोलीस शहर विभागात निवड झाल्याचा खोटा बनाव रचला होता. एवढेच नाहीतर शहरातील विविध ठिकाणी त्याचे फ्लेक्स देखील लावण्यात आले होते. फ्लेक्सवर पोलीस ऋषिकेश राजू जाधव हा पोलीस दलात रुजू झाल्याचे अभिनंदनाची बॅनरबाजी करण्यात आली होती.
बनावाचे पितळ उघडं पडलं
मात्र, हा बनावाचे पितळ फार काळ लपून न राहता उघडं पडलं. परिसरातील नागरिकांना संशय आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशातच अखेर पोलिसांपर्यंत या घटनेची माहिती पोहोचली. तपासादरम्यान, तरुणाने पोलीस ठाण्यात निवड झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. संबंधित तरुण हा खोटा दावा करत असल्याचे समोर आले.
हे ही वाचा : चंद्रपूर : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होऊ लागला, अन् ह्रदयविकाराचा झटका आला, 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नऱ्हे पोलीस ठाणे येथे तरुणाविरोधात फसवणूक आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत माहिती दिली की, अशा खोट्या दावांपासून सावध राहावं.









