Crime News : एका अंगणवाडी सेविकेची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. बुधवारी (22 एप्रिल) सकाळी ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे मृत महिला अंगणवाडी केंद्रात असतानाचा तिची हत्या झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ती एकटीच केंद्रात असताना तिच्यावर आरोपीने हल्ला केला. तिची हत्या करुन आरोपी एका कारमधून फरार झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पंजाबमधील लंबी तालुक्यातील ही घटना असून रमनदीप कौर (वय 30) असं मृत महिलेचं नाव आहे.
ADVERTISEMENT
सकाळी आठ वाजता अंगणवाडीत गेली अन्..
मृत रमनदीप कौरचे पती प्रीतम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमनदीप दोन वर्षांपासून अंगणवाडीत कार्यरत होती. बुधवारी सकाळी आठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती, मात्र अर्ध्या तासानंतर तिच्या हत्येची बातमी घरी पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यावर तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला, ज्यावर शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. मृतदेहाजवळ काही ब्लेड्सही सापडले आहेत. प्रीतम सिंह यांनी सांगितले की, त्यांचे किंवा त्यांच्या पत्नीचे कोणाशीही कोणतेही वैर नव्हते.
हे ही वाचा : IRS ऑफिसरच्या 22 वर्षीय मुलीचा चार्जर वायरने आवळला गळा, त्याआधी तिच्यासोबत नको ते.. नेमका प्रकार काय?
आरोपीला ओळखत नाही
मृताचा भाऊ हरजिंदर सिंह यानेही या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्याने सांगितले की, सीसीटीव्हीमध्ये आरोपी पळताना दिसत असला तरी कुटुंबातील कोणीही त्याला ओळखत नाही. गावात सरकारी ठिकाणी घुसून दिवसाढवळ्या अशा प्रकारे हत्या होत असेल, तर महिलांनी स्वतःला सुरक्षित कसे मानावे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. रमनदीपला दोन लहान मुले असून तिच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पीडित कुटुंबाने आरोपीला तात्काळ अटक करून कठोर न्याय देण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा : होमस्टेमध्ये राहणाऱ्या अमेरिकन महिलेला दिले गुंगीचे औषध, नंतर मालक अन् कामगाराने तीन दिवस..
नातेवाईकांचे जबाब नोंदवले
घटनेची माहिती मिळताच लंबी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि डीएसपी हरबंस सिंह तातडीने पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून फॉरेन्सिक टीमद्वारे पुरावे गोळा केले जात आहेत. डीएसपींनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर याप्रकरणी अधिकृत एफआयआर दाखल करण्यात येत असून, आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











