होमस्टेमध्ये राहणाऱ्या अमेरिकन महिलेला दिले गुंगीचे औषध, नंतर मालक अन् कामगाराने तीन दिवस..
कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. ती या होमस्टेमधऊन अतिशय हुशारीने बाहेर पडली आणि अमेरिकन दूतावासाला याची माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
होमस्टेमध्ये राहणाऱ्या अमेरिकम महिलेला दिले गुंगीचे औषध
नंतर मालक अन् कामगाराने तीन दिवस..
Crime News : कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्ह्यातील कुट्टा गावात एका अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, होमस्टेमध्ये तिला गोड पेयामधून गुंगीचे औषध देण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी होमस्टेचा मालक आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली असून, दोन्ही आरोपींना 3 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कामगार आणि मालकाने केले अत्याचार
या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख वृजेश कुमार अशी झाली असून, तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे आणि संबंधित होमस्टेमध्ये कामाला होता. वृजेशने महिलेला मादक पदार्थाचे सेवन करायला लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात होमस्टे मालकाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालकाने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला आणि पीडित महिलेने कोणाशीही संपर्क साधू नये, यासाठी तीन दिवस होमस्टेमधील वाय-फाय सेवा जाणीवपूर्वक बंद ठेवली होती.
हे ही वाचा : मंडपातून नवरा गेला पळून, दिरांनी दिला नकार, चौथ्या नंबरच्या तरुणाला कसं तरी घोड्यावर चढवलं; मात्र सासऱ्याने घातला घोळ
हुशारीने निसटली अन्..
वाय-फाय सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर, पीडित महिलेने अतिशय हुशारीने तिथून निसटण्याचा मार्ग शोधला. तिने म्हैसूरला जाण्याचे निमित्त केले आणि होमस्टेमधून बाहेर पडण्यात यश मिळवले. म्हैसूरला पोहोचल्यानंतर तिने तातडीने अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दूतावासाने म्हैसूर पोलिसांना ईमेलद्वारे या घटनेची सविस्तर माहिती दिली, ज्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली.
हे ही वाचा : बंद रुम, निळा ड्रम आणि वाहणारं रक्त..11 वर्षीय मुलासोबत काय घडलं? आईच्या प्रेमसंबंधांवर बोलण्यास पोलिसांचा नकार
गुन्ह्याची नोंद
कोडागु जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे की, कुट्टा पोलीस ठाण्यात परदेशी महिलेच्या लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने होमस्टेमधील नियमावली आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









