अनैतिक संबंधाचा संशय, 48 वर्षीय नवऱ्याने 52 वर्षीय बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं, प्रकरणाला वेगळं वळण

मुंबई तक

crime news : नवऱ्याने आपल्याच बायकोची अवैध प्रेमसंबंधाच्या संशयातून हत्या केली. नवऱ्याचे नाव मुबीन शेख (वय 48) आणि हत्या केलेल्या पत्नीचे नाव सरफिया (वय 52) असे आहे. याच प्रकरणातून पती मुबीनने गुरुवारी आपलं तारतम्य सोडलं आणि पत्नी सरफियावर कुऱ्हाडीने हल्ला केला केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याकडून आपल्याच बायकोची प्रेमसंबंधातून हत्या

point

हत्येनंतर पुरुष घटनास्थळावरून फरार

Crime News : उत्तर प्रदेशात बांदा जिल्ह्यात एक भयंकर घटना गेली, ज्यामुळे परिसर हादरून गेला आहे. नवऱ्याने आपल्याच बायकोची अवैध प्रेमसंबंधाच्या संशयातून हत्या केली. नवऱ्याचे नाव मुबीन शेख (वय 48) आणि हत्या केलेल्या पत्नीचे नाव सरफिया (वय 52) असे आहे. याच प्रकरणातून पती मुबीनने गुरुवारी आपला संयम सोडत पत्नी सरफियावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

हे ही वाचा : नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर शंका, धडापासून मुंडकं केलं वेगळं अन् गावभर फिरला... पतीत सैतान जागा झाला

नवऱ्याकडून आपल्याच बायकोची प्रेमसंबंधातून हत्या

संबंधित प्रकरणात हत्येनंतर, मुबीन घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा सतत शोध घेत होते, मात्र सोमवारी गौरीखानपूर गावात त्याचा ठावठिकाणा लागला असता, त्याचा मृतदेह झाडाला टांगला. ही माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. 

हे ही वाचा : नांदेड : माय लेकासह आत्यावर काळाचा घाला, कार-दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत, दोघांची प्रकृती चिंताजनक 

मुबीनविरुद्ध पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाबाबत सांगितलं, मुबीनविरुद्ध त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीने आत्महत्या केल्यानंतर, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. 
 

हे वाचलं का?