नांदेड : माय लेकासह आत्यावर काळाचा घाला, कार-दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत, दोघांची प्रकृती चिंताजनक 

मुंबई तक

Nanded news : वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतताना तिघांवर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने दोन दुचाकीला धडक दिली. या धडकेत माय-लेक आणि त्या मुलाची आत्या या तिघांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हदगाव तालुक्याच्या हडसनी फाटा परिसरातील ही घटना आहे.

ADVERTISEMENT

Nanded news
Nanded news
google news

बातम्या हायलाइट

point

कार आणि दुचाकीच्या धडकेत माय लेकरासह आत्याचा भीषण अपघात 

point

अपघातादरम्यान तिघांचा दुर्दैवी अंत 

Nanded news : कुवरचंद मंडले - वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतताना तिघांवर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने दोन दुचाकीला धडक दिली. या धडकेत माय-लेक आणि तरुणाची आत्या या तिघांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हदगाव तालुक्याच्या हडसनी फाटा परिसरातील ही घटना आहे. मृतांची नावे समोर आलेली आहेत, यशवंत भाऊराव नरवाडे (वय 23 वर्ष रा.निवघा बाजार  हदगाव), अनुसयाबाई बालाजी लोणारे ( रा. दरेकरवाडी ता. मुदखेड) अशी ओळख समोर आली. 

कार आणि दुचाकीच्या धडकेत माय लेकरासह आत्याचा भीषण अपघात 

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. दुचाकीला दिलेल्या धडकेत निष्पाप तिघेजण फेकले गेले, या घटनेत तिघांचा दुर्दैवी अंत झाला. धडक दिलेल्या वाहनाची ओळख पटली आहे, एम.एच. 12 के.एन. 2509 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने दोन दुचाकीला उडवले. तसेच या अपघातात कारचालक देखील गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. 

अपघातादरम्यान तिघांचा दुर्दैवी अंत 

अपघातानंतर रेखाबाई नरवाडे, यशवंत नरवाडे या माय लेकासह मुलाची आत्या अनुसयाबाई लोणारे यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. तर दुसऱ्या एका दुचाकीला धडक दिलेल्या दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातात कार चालकालाही जबर मार लागला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. 

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच, हदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माय लेकाच्या मृत्यूने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेनं परिसरात लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम दुर्रक्षामुळेच हे बळी जात असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. 

हे वाचलं का?