IRS Officer Daughter Murder : दिल्लीच्या अमर कॉलनीतील हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, अटक करण्यात आलेला राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगड येथील रहिवासी राहुल मीणा याच्याबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. कुटुंबिय आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलला मोबाईलवर 'तीन पत्ती' आणि 'लूडो' सारख्या जुगाराचे व्यसन जडले होते. ऑनलाइन गेममध्ये राहुल लाखो रुपये हारला होता. त्याचे मित्र त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी दबाव टाकत होते. याच पैशांच्या चोरीच्या उद्देशाने तो आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या घरी गेला होता, जिथे त्याने त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली.
ADVERTISEMENT
राहुलच्या बहिणींनी सांगितले की, तो अभ्यासात हुशार होता. त्याला 10 वीत 73 टक्के, तर 12 वीत विज्ञान शाखेत 90 टक्के गुण मिळाले होते. दिल्लीत नोकरी करत असतानाही तो गेममध्ये पैसे हारला होता, त्यामुळे त्याने तिथल्या दुकानदारांकडून आणि इतर लोकांकडून पैसे उधार घेतले होते. ही बाब जेव्हा आयआरएस अधिकाऱ्याला समजली, तेव्हा त्यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकले होते.
दिल्लीच्या पॉश अमर कॉलनीतील आयआरएस अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी राहुल मीणाला दिल्लीतूनच अटक केली आहे. या दरम्यान, अलवरमध्ये राहुलच्या कुटुंबियांनी 'आज तक'शी बोलताना मोठे खुलासे केले. त्यांनी सांगितले की, राहुलला 12 वी पासूनच ऑनलाइन गेमचे व्यसन लागले होते. तो खेळासाठी आपली मार्कशीट, मोबाईल, बाईक आणि घरातील वस्तूही गहाण ठेवायचा किंवा विकायचा.
राहुलच्या कुटुंबियांनी काय सांगितले?
राहुलचे वडीलही दिल्लीत आयकर विभागात आणि अधिकाऱ्यांच्या घरी काम करायचे. त्यांनी आपल्या जागी मेव्हण्याला नोकरीवर लावले होते आणि त्याच ओळखीने राहुलला एका अधिकाऱ्याच्या घरी नोकरी मिळाली होती. राहुल गेल्या 8 महिन्यांपासून त्या घरात काम करत होता, त्यामुळे त्याला घराची इत्थंभूत माहिती होती. तिथेही तो दिवसभर जुगार खेळायचा. त्याने लोकांशी उधारी केली होती, ज्यावरून वादही झाले होते. लोकांच्या तक्रारीनंतर त्याला नोकरीवरून काढण्यात आले.
हे ही वाचा : महाराष्ट्र : पैसा, प्लॉट अन् घर गेलं, आईची आत्महत्या, शहीदपुत्राची कहाणी, नोकरीसाठी 2 कोटींची फसवणूक
बलात्काराचा आरोप खोटा
त्यानंतर दीड महिन्यापूर्वी राहुल गावी परतला होता. त्याने घरी खोटे सांगितले की तो सुट्टीवर आला आहे. गावी असताना त्याने 5 लाख रुपये जिंकले होते, ज्यामुळे त्याच्या मित्रांनी स्वतःच्या आयडीवरून त्याला खेळायला लावले, पण तो ते पैसेही हरला. मित्रांनी पैशांसाठी तगादा लावल्याने त्याने दिल्लीत चोरीचा कट रचला. ज्या व्यक्तीने राहुलवर आपल्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, तो राहुलचा मित्र असून ते सोबत जुगार खेळायचे. पीडितेचा पती राहुलवर पैशांसाठी दबाव टाकत होता आणि त्याच पैशांच्या व्यवस्थेसाठी राहुल दिल्लीला गेला होता. नातेवाईकांच्या मते, अलवरमधील बलात्काराचा आरोप खोटा आहे.
हे ही वाचा : "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा
त्याला कडक शिक्षा व्हावी
राहुल नेहमी शांत राहायचा, त्यामुळे तो कोणाची हत्या करेल असे कुटुंबियांना वाटले नव्हते. मात्र, त्याने हे कृत्य केले असेल, तर त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. सध्या राहुल मीणाला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस त्याला गुन्ह्याच्या घटनास्थळी आणि तपासासाठी अलवर येथे घेऊन जाणार आहेत.
ADVERTISEMENT











