नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर शंका, धडापासून मुंडकं केलं वेगळं अन् गावभर फिरला... पतीत सैतान जागा झाला

मुंबई तक

23 Apr 2026 (अपडेटेड: 23 Apr 2026, 04:18 PM)

crime news : नवऱ्यानेच आपल्या बायकोचं मुंडकं छाटलं आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. तिचे कापून टाकलेले शीर एका पोत्यात भरले आणि तो गावभर फिरू लागला होता. या घटनेनं गाव हादरून गेलं आहे, नवऱ्याने असं हैवानी कृत्य का केलं असाव? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोचं शीर धडापासून केलं वेगळं

point

पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत केली हत्या

Crime News : छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात नवऱ्यानेच आपल्या बायकोचं मुंडकं छाटलं आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. तिचे कापून टाकलेले शीर एका पोत्यात भरले आणि तो गावभर फिरू लागला होता. आरोपी नवऱ्याचे नाव सालिक राम (वय 58) असे आहे. तसेच खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव चेचबाई (वय 50) असे होते. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनास्थळी कुंकवाची पुडी.. भयंकर कांड

दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोचं शीर धडापासून केलं वेगळं

बुधवारी पत्नी चेचबाईशी विवाद झाला असता, दारूच्या नशेत एका धारेवर शस्त्राने तिचा गळा चिरला, तिचे कापलेले शीर एका पोत्यात भरलं आणि पोलीस ठाणे गाठलं. जेव्हा ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळाली असता, त्यांनी हे प्रकरण पोलिसांना सांगितलं. संबंधित प्रकरणात लक्षात घेत पोलिसांनी आरोपी सालिक रामच्या मुसक्या आवळल्या. 

हे ही वाचा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम सुरु, नियोजित वेळेसाठी वाहतूक सेवा बंद

पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत केली हत्या

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सालिक हे एका पॉल्ट्री फार्ममध्ये चौकीदार म्हणून काम करत होते. सालिकला आपली पत्नी चेचबाईच्या चारित्र्यावर शंका होती. ज्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. बुधवारी याच वादाने क्रूरतेचं टोकं गाठलं आणि सालिक रामने आपली पत्नी चेचबाईचे शीर धडापासून वेगळं केलं. पोलिसांनी सांगितलं की, हत्यारे आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. संबंधितच प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.