पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम सुरु, नियोजित वेळेसाठी वाहतूक सेवा बंद

मुंबई तक

Pune-Mumbai Highway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणालीत मोठा बदल करण्यात आला आहे. या महामार्गावर 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही पुलावर शटरिंग आणि रंगरंगोटीचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

pune-mumbai expressway
pune-mumbai expressway
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-पुणे महामार्ग आज आणि उद्या बंद

point

सकाळीच वाहतूक थांबवली

पुण्याची गोष्ट : कृष्णा पांचाळ - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणालीत मोठा बदल करण्यात आला आहे. या महामार्गावर 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही पुलावर शटरिंग आणि रंगरंगोटीचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे आता वाहनचालक आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त विवेक पाटील यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 

हे ही वाचा : "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

मुंबई-पुणे महामार्ग आज आणि उद्या बंद

सुरुवातीला महामार्गावरील मेगा ब्लॉक दुपारी 12:00 ते 3:00 या वेळेत नियोजित होता, मात्र अवजड वाहनांना कामाच्या नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ लक्षात घेता घेत, हा ब्लॉक नियोजित वेळेतच पूर्ण लागू करता येणार आहे. 

सकाळीच वाहतूक थांबवली

परिणामी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार असल्याचा सल्ला देण्यात आला. प्रवाशांना किवळे-देहुरोड मार्गे जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान 24 एप्रिल रोजी दुपारी 11 ते 3 वाजता मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे थांबवण्यात येणार आहेत, तर दुसरीकडे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरुच राहील. 

हे ही वाचा : बारामतीच्या पोटनिवडणुकीत जय पवार सर्वात अ‍ॅक्टिव्ह मोडवर, सुनेत्रा पवारांची प्रचार यंत्रणा कशी हाताळली?

सद्यस्थितीचा विचार केल्यास पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने थांबवण्यात आली, तर मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. यामुळे प्रवाशांनी प्रावासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपलं नियोजन करावं, असा सल्ला देण्यात येत आहे. 

हे वाचलं का?