18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनास्थळी कुंकवाची पुडी.. भयंकर कांड

मुंबई तक

Crime News : गुरुवारी सकाळी 7;30 वाजता कुआडी ठाणे परिसरात आंब्याच्या झाडाला 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता, या घटनेनं कुआडी ठाणे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. पीडितेचा मृतदेह ओढणीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीचं नाव प्रिया असे होते.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियाचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत

point

घटनास्थळी कुंकवाची पुडी

Crime News : बिहारच्या अररिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सकाळी 7;30 वाजता कुआडी ठाणे परिसरात आंब्याच्या झाडाला 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता, या घटनेनं कुआडी ठाणे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. पीडितेचा मृतदेह ओढणीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीचं नाव प्रिया असे होते. ती बुधवारी रात्रीपासूनच गायब झाली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, ती कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेली. 

हे ही वाचा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम सुरु, नियोजित वेळेसाठी वाहतूक सेवा बंद

प्रियाचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत, घटनास्थळी कुंकवाची पुडी

प्रियाच्या मृत्यूने गावात एकच खळबळ माजल्याचं चित्र आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणतगर्दी केली केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कुआडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजू कुमार यांच्या नेृतृत्वात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तपासादरम्यान, मृत तरुणीची चप्पल तसेच घटनास्थळी कुंकवाची पुडी मिळाली होती. यामुळे या घटनेला एक वेगळं वळण प्राप्त झालं. 

आजीसुद्धा जवळच गरुड पुराण ऐकायला गेली असता, तरुणी घराबाहेर पडली

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती वडील उपेंद्र सिंह यांनी सांगितलं की, बुधवारी सायंकाळी ते घराबाहेर होते. प्रियाची आजीसुद्धा जवळच गरुड पुराण ऐकायला गेली होती. प्रियाचा भाऊ हा घरातीच दुसऱ्याच खोलीत गेला होता. तेव्हा ती रात्री घरातून बाहेर पडली. 

हे ही वाचा : ‘..तर भाजपला दोष देऊन काय उपयोग? याची गरज नव्हती’, श्रीनिवास पवार रोहित अन् जय पवारांबाबत काय म्हणाले?

या घटनेची माहिती सकाळी मिळाली असता, घटनास्थळी दाखल पोलिसांनी प्रियाची देखील झडती घेतली तेव्हा काहीही आढळून आलं नाही. नंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. 

हे वाचलं का?