Crime News : बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीवर कॉर्पोरेट क्रेटिड कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यावर कॉर्पोरेट क्रेडिट कार्डचा वापर करत अंदाजे 27 लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप आहे. पैशांच्या मागणी केल्यानंतर, त्याला अश्लील कंटेट पाठवून बॉसला पैशांवरून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती, या प्रकरणाने कंपनीतील कर्मचारी हादरून गेले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणेकरांनो हित साधून घ्या, मेट्रो 2 ची प्रतिक्षा लवकरच संपणार, महत्त्वाची अपडेट समोर
कर्मचाऱ्याने कंपनीचे उधळले 27 लाख रुपये
एनडीटीव्ही या वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्याला शासकीय खर्चासाठी 2 लाख रुपये इतके मार्यादीत कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड देण्यात आले होते. त्याने ऑक्टोबर ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या चार महिन्यांच्या कालावधीत 27 लाख रुपयांचा कथितरित्या गैरवापर करण्यात आला होता. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर, कंपनीने 12 जानेवारी 2024 रोजी संबंधित कर्मचाऱ्याला ई-मेलद्वारे विचारणा केली होती. 15 जानेवारी रोजी दिलेल्या आपला प्रतिसादात, त्याने पैशांचा गैरवापर केल्याचा कबुलीनामा दिला होता. त्याला चीन आणि पाकिस्तानातून अज्ञातांकडून धमक्या दिल्या जात होत्या, अशातच हे कृत्य समोर आले.
पुरेसा वेळ आणि संधी देऊनही पैसे देण्यास तरुण अपयशी
नंतर कंपनीला आश्वासन दिले की, तीन हप्त्यांची रक्कम परत करण्यात आली. 29 जानेवारी रोजी ई-मेलद्वारे नमूद करण्यात आलं की, तो फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 10 लाख रुपये, तसेच उर्वरित रक्कम आठवडाभरात परत करेल अशी ग्वाही दिली. दरम्यान, पुरेसा वेळ देऊनही, तो पैसे परत करण्यास अपयशी ठरला अशी माहिती समोर आली.
हे ही वाचा : पुणे: लग्न जुळत नसल्याने तरुणाने पोलीस असल्याचा केला खोटा दावा, शहरभर अभिनंदनाची बॅनरबाजी; पितळ उघडं पडलं
पैशांची मागणी केल्यास अश्लील फोटो आणि आत्महत्येची दिली धमकी
या घटनेदरम्यान, 9 फेब्रुवारी 2024 रोजी, संबंधित कर्मचाऱ्याने कथितरित्या त्या व्यक्तीला अश्लील फोटो पाठवले, नंतर आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले. या प्रकरणात कंपनीची औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात एफआरआय नोंदवण्यात आली.
ADVERTISEMENT











