Crime news : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पतीने आपल्याच पत्नीला परपुरुषासोबत अंथरुणात बघितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सात फेरे घेऊन ईश्वर सक्षीने विवाह केलेल्या पत्नीनेच पतीला नको असलेलाच दिवस दाखवला. पतीने याची कधीही कल्पना देखील केली नव्हती. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गोष्ट पुण्याची : शहरात 'या' दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद, महत्त्वाचं कारण आलं समोर
नेमकं काय घडलं?
गोरखपूरच्या दुघरा गावातील रहिवासी असलेल्या प्रद्युम्न चौरासियाचा भाजी विक्रीचा धंदा आहे. तो आपले काम करून घरी परतला. तेव्हा त्याच्या पत्नीने अंकित चौरासिया नावाच्या तरुणाला घेऊन अंथरुणात झोपली होती. तेव्हा पतीने आपल्या पत्नीला याबाबत अनेकदा समजावून देखील सांगितले. त्याने या नात्याला विरोध दर्शवला. पण पत्नीने त्याचं काहीही ऐकलं नाही. त्याला विश्वास होता की एक दिवस त्याची पत्नी समजून घेऊन, पण जेव्हा प्रद्युम्न कामासाठी बाहेर जायचा तेव्हा त्याचा प्रियकर अंकित घरी यायचा आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत असयाचे. रविवारी याचदरम्यान एक भयंकर घटना घडली.
पत्नी आपल्या प्रियकरासोबत एकाच अंथरूणावर आक्षेपार्ह स्थितीत
रविवारी सायंकाळी प्रद्युम्न कामावरून घरी परतला असता, घरात पत्नी आपल्या प्रियकरासोबत एकाच अंथरूणावर आक्षेपार्ह परिस्थितीत होती. हे चित्र स्वत:पतीने पाहिले तेव्हा त्याने या कृत्याला विरोध दर्शवला होता. त्याने आपल्या पत्नीवर आरडाओरड केली. तेव्हा पत्नीचा प्रियकराला राग अनावर न झाल्याने त्याने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : कोल्हापुरात डॉक्टर लेकीनं 78 वर्षीय वडिलांच्या बोटाचा चावा घेत तुकडा पाडला, अंगावर गाडी घालत शिवीगाळ अन् धमकी...
प्रियकराने पतीचे हातपाय बांधले आणि नंतर त्याचा गळा चिरून हत्या केली. या हल्ल्यावेळी पतीने आरडाओरड केली. तेव्हा पत्नी आणि तिचा प्रियकराने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळताच, लोकांनी तातडीने प्रद्युम्नला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं.
ADVERTISEMENT










