बायकोच्या पोटात वाढत होतं बाळ, पतीने तिला लाथ मारली, नंतर 'त्या' कारणावरून स्कार्फने गळा आवळत... धक्कादायक कांड

crime news : पती पत्नीचा मृतदेह एका खोलीत आढळून आला होता. पत्नी हा गर्भवती होती, तिच्या हात्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. नेमकं हे कोणी आणि का घडवून आणलं याची माहिती पुढीलप्रमाणे...

crime news

crime news

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 19 Nov 2025, 05:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राहुलचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला 

point

दरवाजा तोडला असता, घरातील दृश्य भयानक

point

पत्नीच्या पोटात वाढणारे मूल भाऊ चंदनचे असल्याचा संशय...

Crime News : क्रिस्टल हाऊसमध्ये काम करणाऱ्या पतीसह त्याच्या पत्नीचा मृतदेहा आढळल्याची माहिचती समोर आली आहे. त्यानंतर दोघांचे मृतदेह घटनास्थळी सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाचा तपास केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पॉस्टमॉर्टममध्ये सुमन ही सात महिन्यांचीच गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. दोघेही बुलंदशहरहून नोकरीसाठी आले होते. पतीचं नाव राहुल शर्मा (वय 25) आणि पत्नीचं नाव सुमन शर्मा (वय 23) असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणाचा पहिला प्रेमविवाह, कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पुन्हा दुसरा विवाह, 'त्या' एका फोनमुळे भोगतोय कर्माची फळं

राहुलचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला 

हत्येच्या ठिकाणी पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात एक गुंडाळलेला कागद आढळून आला. तर राहुलचा मृतदेह फासावर लटकवलेला आढळून आला होता. तपासादरम्यान, खोलीत तिसरा कोणीही व्यक्ती नसल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा विखुलरलेले सामान आणि खोलीची स्थिती भलतंच संशय दर्शवत होती. खोलीत जे काही घडलं ते राहुल आणि त्याची पत्नी सुमन यांच्यातच असल्याचं स्पष्ट झाले.

 दरवाजा तोडला असता, घरातील दृश्य भयानक 

सुमन आणि राहुलची खोली उघडीच होती. बराच वेळ खोलीतून कोणीच बाहेर आले नाही तेव्हा कर्मचाऱ्यांनी दार ठोठावले. पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता, घरातील दृश्य अगदीच भयानक होते. राहुलचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत होता, तर सुमनचा मृतदेह हा बेडच्या कडेला रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला होता. 

पोलिसांनी खोलीची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावले, त्याचदरम्यान राहुलने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यानं म्हटलं होतं की, त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. तेव्हा त्याने आपला धाकटा भाऊ चंदनला उद्देशून जे काही लिहिले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. 

पत्नीच्या पोटात वाढणारे मूल भाऊ चंदनचे असल्याचा संशय...

राहुलला संशय होता की त्याच्या पत्नीच्या पोटात वाढणारे मूल त्याचे नसून त्याचा भाऊ चंदनचे आहे. चिठ्ठीत त्याने या घटनेसाठी त्याच्या भावाला जबाबदार धरले. या संशयामुळे राहुल शर्माने त्याची पत्नी सुमनची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. 

या घटनेबाबत एसीपी पियश्री पाल यांनी सांगितलं की, सोमवारी रात्री उशिरादरम्यान, राहुल आणि सुमनने दारू पिऊन वाद घातला. त्यानंतर त्या वादाचे हाणामारी रुपांतर झाले. तेव्हा राहुलने तिच्या पत्नीला लाथ मारली आणि नंतर तिच्याच स्कार्फने तिचा गळा दाबला. 

हे ही वाचा : पती भाजी विकून आला घरी, पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात आक्षेपार्ह स्थितीत नको तेच.. नंतर लॉयल पतीलाही... भयंकर कांड

त्यानंतर सुमनने आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला आणि ती रस्त्यावर पोहोचली. तेव्हा राहुलने तिचा पाठलाग केला आणि तिला जबरदस्ती पुन्हा खोलीत नेले. तेव्हा शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकली, परंतु कौटुंबिक असल्याचे समजून कोणीही कसलीही कारवाई केली नाही. सध्या, पोलिस कुटुंबाकडून लेखी तक्रारीची वाट पाहत असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

    follow whatsapp