Crime News : एका तरुणाने तब्बल दोन तरुणींशी विवाह केला होता. त्या तरुणाचे आयुष्य आतापर्यंत चांगले सुरु होते. पण, एका फोन कॉलने सर्वच परिस्थिती बदलून गेल्याने पतीचे बिंग फुटलं आणि त्याचं सत्य समोर आल्याची घटना आहे. तरुणाचे नाव राहुल दुबे असे आहे. तर त्याच्या एका पत्नीचे नाव खुशबू दुबे आणि शिवांगी दुबे अशा त्याच्या दोन पत्नी आहेत. ही घटना प्रयागराज येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अंबरनाथमध्ये तरुणावर 8-9 जणांकडून कोयत्याने सपासप वार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद
नेमकं प्रकरण काय?
पती राहुल हा डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. त्याने आपलं पहिलं लग्न प्रेमसंबंधातून झाले होते, तर त्याने दुसरे लग्न हे आपल्या कुटुंबीयांच्या मान्यतेनुसार केले. त्यापैकी राहुलने आपल्या एका पत्नीला एका शहरात लपवून ठेवले होते आणि दूसरी पत्नी त्याच्याच घरात राहत होती. हे प्रकरण फार काळ लपू शकले नाही. हे प्रकरण सर्वांच्याच चव्हाट्यावर आले.
एका फोनने राहुलचं फुटलं बिंग
पहिली पत्नी खुशबूने राहुलच्या मोबाइल फोनवर संपर्क केला. तेव्हा त्याची दुसरी पत्नी शिवांगीने तो फोन उचलला असता, त्याचे बिंग फुटलं. तेव्हा खुशबूने विचारले की, तुम्ही कोण आहात? त्यावर खुशबूने सांगितलं की, ती राहुलची पहिली पत्नी आहे. दोघींनाही राहुलपासून एक-एक मुलगी आहे. तेव्हा खुशबूने शिवांगीला लग्नाचे फोटो देखील पाठवले होते. फोटो पाहून शिवांगी हैराण झाली, हे चित्र पाहून दोघांनी मिळून पत्नीवर एफआरआय दाखल केला. या प्रकरणात आता पोलिसांनी राहुलला अटक केली आहे.
हे ही वाचा : आयटी इंजिनिअर नवऱ्यावर पत्नीचा अत्याचार, सहा महिने तुरुंगात बसून लिहिलं पुस्तक, पुरुष हक्क दिनाची मन हेलावणारी घटना
राहुल दुबेने आपली प्रेयसी खुशबूसोबत नोव्हेंबर 2024 मध्ये प्रेमविवाह केला होता. काही काळानंतर आपल्या पतीला दुसरी देखील पत्नी असल्याची माहिती समजली. त्यानंतरच हे बिंग फुटलं. तेव्हा दोघींनी मिळून राहुलला दोन विवाह करण्यावरून जबाब विचारला होता. तेव्हा दोघींनांही मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी राहुल दुबेला अटक केली आहे.
ADVERTISEMENT










