आनंदोत्सवासाठी लग्नसोहळ्यातील मिरवणुकीत गोळीबार, नवऱ्याच्या मानेवर गोळी लागून मृत्यू, परिसरात गोंधळ उडाला

मुंबई तक

• 03:51 PM • 30 Nov 2025

Crime News : लग्नसोहळ्यानंतर मिरवणुकीत मिठाई वाटताना गोळीबार करण्यात आला, याच गोळीबारात नवऱ्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तरुणाचा हवेत गोळीबार

point

कुटुंबाने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला

Crime News : लग्नसोहळा सुरु असताना एक दु:खद घटना घडली आहे. लग्नसोहळा पार पडल्यानंतर मिरवणुकीत मिठाई वाटताना गोळीबार करण्यात आला, याच गोळीबारात नवऱ्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. नवऱ्याचे नाव मोहम्मद इरशाद असे नाव होते. त्याच्या मानेला ही गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बिहारमधील खगरिया जिल्ह्यात घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'दोन नंबरला किंमत नसते.." रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने शिंदेसेना आणि भाजपमधील वाद शिगेला, डोंबिवलीत चव्हाणांसमोरच..

या गोळीबारात नवरा मुलगा गंभीर जखमी झाला होता. परिस्थिती बघता त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर, डॉक्टरांनी त्याला चांगल्या उपचारासाठी पटना येथे नेण्यास सांगितले. पटनाला नेतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला होता, या घटनेनं शुभकार्यातच विरजन आलं. 

आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तरुणाचा हवेत गोळीबार

मृत तरुणाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, रुखसर अमजद या तरुणीशी मोहम्मद इरशादचा विवाह झाला होता. लग्नसोहळा पार पडल्यानंतर लग्नातील पाहुण्यांना मिठाई वाटपाचे काम सुरु होते. सर्व मंडळी वधू आणि वराला शुभेच्छा देत होते. अशातच एका तरुणाने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार गेला, थेट गोळी सुटून नवरदेवाला लागली. 

हे ही वाचा : 19 मिनिटांचा प्रायव्हेट क्षण असणारा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर केली आत्महत्या? सत्य काय?

कुटुंबाने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला

दरम्यान, कुटुंबाने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. वराचे कुटुंब हे असह्य झाले असून, ते धायमोकलून रडत होते. या प्रकरणात आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि नंतर कुटुंबाकडे सोपवण्यात आला. घटनास्थळी उपस्थितांनी चौकशी केली जात असून या घटनेतील दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.