स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये तरुणींचा आढळला मृतदेह, बाथरूममध्ये आढळलं भूलीचं इंजेक्शन

Crime News : स्वामीनारायण मंदिराच्या बाथरूममध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळल्यानंतर गुजरातमधील सुरत शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही तरुणींचे वय हे 18 ते 20 वर्षे होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि संबंधित घटनेचा तपास देखील केला. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, त्यांना घटनास्थळी भुलीचे इंजेक्शन आढळून आले होते.

crime news

crime news

मुंबई तक

• 03:18 PM • 08 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये तरुणींचा आढळला मृतदेह

point

बाथरूममध्ये आढळलं बेशुद्धीसाठी वापरले जाणारे भूलीचे इंजेक्शन

Crime News : स्वामीनारायण मंदिराच्या बाथरूममध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळल्यानंतर गुजरातमधील सुरत शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही तरुणींचे वय हे 18 ते 20 वर्षे होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि संबंधित घटनेचा तपास देखील केला. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, त्यांना घटनास्थळी भुलीचे इंजेक्शन आढळून आले होते. मृत्यूपूर्वी दोन्ही मुलींनी चॅटजीपीटीवर ''आत्महत्या कशी करावी'', याबद्दल शोध घेतला होता. ही घटना गुजरातमधील सूरतमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तु मला आवडतेस', म्हणत जालन्यात सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर खाली पाडून...

स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये तरुणींचा आढळला मृतदेह

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारपासून दोन्ही विद्यार्थिनी या बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर रात्री सानिया गावातील स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये ते मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी दिंडोली पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ताची तक्रार दाखल केली, फोन केला पण कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. फोन लोकेशनचा शोध घेतल्यानंतर, पोलिसांनी एक पथक सानिया गावात पाठवले आणि त्यांचा तपास केला होता, त्यांना त्यांची एक स्कूटर ही मंदिराजवळ आढळून आली होती. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही मुली मंदिरातील बाथरूमकडे जाताना दिसतात

संबंधित प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही मुली मंदिरातील बाथरूमकडे जाताना दिसत आहेत. बाथरूमचा दरवाजा तोडून उघडला असता त्यात त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. एका मुलीला सिव्हिल रुग्णालयात आणि दुसऱ्याला स्माइमर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही रुग्णालयातील डॉ्कटरांनी त्यांना मृत घोषित केले. 

हे ही वाचा : बलात्कार पीडितेकडे गावाला मटण अन् दारुची पार्टी देण्याची मागणी, पंचायतीचा अजब निर्णय; पोलिस काय करताहेत?

बाथरूममध्ये आढळलं बेशुद्धीसाठी वापरले जाणारे भूलीचे इंजेक्शन

बाथरूमची झडती घेतली असता, बेशुद्धीसाठी वापरले जाणारे भूलीचे इंजेक्शन सापडले, तर एका पीडितेच्या फोनच्या गॅलरीत आत्महत्येशी संबंधित काही फोटो सापडले. पोलिसांनी सांगितले की दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकले होते आणि शाळेपासून चांगले मित्र होते. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

    follow whatsapp