Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या मुलाचा गळा दाबत हत्या केली आहे. लहान मुलाचे वय 4 होते. महिलेने आपल्या प्रियकारसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने आपल्या मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावत त्याला जखमी केलं. त्यानंतर चिमुरड्याचा मृतदेह एका चादरीत झाकून ठेवला. यानंतर तिने मृतदेह मुलाच्या आजोबाच्या शेजारी ठेवला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. यानंतर तिची कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा : शेजाऱ्यांचा वाद विकोपाला, चाकू- कोयते काढले, गुप्ता आणि शेख कुटुंब भिडलं, तिघांचा मृत्यू... प्रकरण काय?
ADVERTISEMENT
नरवाल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पती सुशीलचा विवाह हा फतेहपूर येथील मनिषासोबत झाला होता. त्यांना 4 वर्षांचा एका लहान मुलगा होता. काही वेळापूर्वी मनिषाचे त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. सुशीलने एकदा मनिषाला तिच्या प्रियकरासोबत रंगेहत पकडलं होतं. त्यानंतर पत्नीला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. एका महिन्यांपूर्वी ती तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली. त्यानंतर प्रियकरांच्या घरावर दबाव आणण्यात आला होता. सुशीलने तीन दिवसांपूर्वी मनिषाने तिच्या मुलासोबत तिच्या मुलासह घरी बोलावले होते.
घरी परतल्यानंतर सुशीलने मनिषाला अधिक सुनावले होते. तो म्हणाला की, जर तुला पळून जायचेच होतं तर तू माझ्या मुलाला सोबत का घेऊन गेली आहेस? अशावेली मनिषाने तिच्या पतीचे म्हणणे ऐकूण घेतलं. त्यानंतर तिने तरुणासोबत पळून जाण्याचं ठरवले होते. अशावेळी तिच्या प्रेमप्रकरणात निष्पाप मुलगा अडथळ बनत होत होता. अशावेळी रविवारी सायंकाळी तिने निष्पाप मुलाचा तावीजला असणाऱ्या दोऱ्याने गळा दाबत हत्या केली. त्यानंतर तिने आपल्या मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेत मुलाला जखमी केलं.
त्यानंतर त्या निष्पाप मुलाचा मृतदेह तिने चादरीत गुंडाळला आणि मुलाचे आजोबा फूल सिंग यांच्या शेजारी नेऊन ठेवला. काही वेळाने मुलाच्या आजोबाने आपल्या नातवाला रक्ताने मृतदेह पाहिला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आरडोओरड होऊन कुटुंबातील सदस्य एकत्र आले. त्यानंतर पत्नीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अशावेळी पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली. या चौकशीत तिने हे कृत् आपणच केल्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रा म्हणाली, 'हल्ल्याला सर्वस्वी सरकार...' व्हिडिओ होतोय व्हायरल
दरम्यान, संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे. अशातच आता पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. त्यानंतर आम्ही पतीच्या सांगण्यावरून पत्नीवर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पत्नीनेही या प्रकरणात हत्येची कबुली दिली आहे.
ADVERTISEMENT
