बाळाच्या घशात अन्नाचा अडकला कण, आई गाण्याच्या कार्यक्रमात व्यस्त; सावत्र बापानं...

crime news : दीड वर्षाच्या लहान बाळाचा संशयास्पद परिस्थितीत दुर्दैवी अंत झाला. सुरूवातीला बाळाच्या घशात अन्नाचा कण अडकल्याने हा अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. मात्र, पोलिसांच्या तपासातून एक भयंकर सत्य समोर आलेलं आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:00 AM • 04 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दीड वर्षांचा मुलाच्या घशात अन्नाचा अडकला कण 

point

मुलाच्या नाजूक शरीरावर जखमा

Crime News : केरळच्या नेदमंगड परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका दीड वर्षाच्या लहान बाळाचा संशयास्पद परिस्थितीत दुर्दैवी अंत झाला. सुरूवातीला बाळाच्या घशात अन्नाचा कण अडकल्याने हा अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. मात्र, पोलिसांच्या तपासातून एक भयंकर सत्य समोर आलेलं आहे. दरम्यान हा अपघात नसून ही निर्घृण हत्ा असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले. बाळाच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या, तसेच शरीरावर अनेक खुना देखील आढळून आल्या होत्या. संबंधित प्रकरणात बाळाच्या सावत्र वडिलांना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 14 वर्षीय मुलीवर 20 दिवस कुलूपबंद घरात नको तेच.. लाज आणणारा प्रकार

दीड वर्षांचा मुलाच्या घशात अन्नाचा अडकला कण 

घटने दिवशी दीड वर्षांचा निष्पाप मुलगा अर्शीद सावत्र वडील अशकारसोबत होता. अशकारने रुग्णालय आणि पोलिसांची दिशाभूल करण्यात आली. त्याने सांगितलं की, तो मुलाला भात भरवत होता. मात्र नंतर त्याचदरम्यान बाळाला उलट्या होऊ लागल्या, अन्न त्याच्या घशात अडकले. गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला तातडीने सॅट रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. सर्वात भयंकर बाब अशी की, जेव्हा लहान बाळ अंतिम घटीका मोजत होते तेव्हा त्याची आई अखिला ही त्याला सोड़ून एका नाच गाण्याच्या कार्यक्रमात गेली होती. 

मुलाच्या नाजूक शरीरावर जखमा

तक्रारीच्या अहवालानुसारने या भयंकर हत्येचा पर्दाफाश झाला आहे. अहवालानुसार, मुलाच्या नाजूक शरीरावर शारीरिक हल्ल्याच्या अनेक खोल जखमा आढळून आल्या होत्या. यापूर्वी मुलाचे काही वेदनादायक फोटो समोर आले. अशकार आणि पत्नी अखिलाने इजा लपवण्याच्या बहाण्याने मुलगा पडल्याचा दावा केला. तसेच त्याच्या हातावर प्लास्टर देखील लावण्यात आले होते. 

हे ही वाचा : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या पोटात बाळ...

कुटुंब आणि नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कसून चौकशी केली. नातेवाईकांनी पोलिसांनी सांगितलं की, सावत्र वडील अशकर हा मुलाला वारंवार बेदम मारहाण करायचा, नंतर छळ करायच. पोलिसांनी हत्येची पुष्टी केली. क्रूर सावत्र आणि निष्काळजी आई अखिला यांना अटक करण्यात आली.