सासूने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?

नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे सासू आणि जावयाच्या कारनाम्याची आणि एका हत्येची.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 11:37 AM • 03 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सासूने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई

point

पुढं घडलं भयानक

point

कुणाचा गेला जीव?

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे सासू आणि जावयाच्या कारनाम्याची आणि एका हत्येची. या प्रकरणातील आरोपी महिलेने पोटच्या 16 वर्षीय मुलीचे लग्न आपल्या बॉयफ्रेंडसोबतच लावून दिले. ही हादरवून टाकणारी घटना आहे बिहारच्या अररिया मधील. सासू आणि जावयाच्या या नात्याला विवाहित मुलीने विरोध केला. त्यामुळे दोन्ही आरोपींनी एक टोकाचा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे 16 वर्षीय नवविवाहितेला म्हणजे साजिदाला संपवण्याचा. 

हे वाचलं का?

बॉयफ्रेंडसोबत लावून दिले मुलीचे लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सासू शाइस्ता परवीन आणि जावई अब्बू नासर यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सतत लपून-छपून भेटावं लागत असल्यानं दोघंही वैतागले होते. अखेर त्यांनी वेगळा विचार केला. शाइस्ताने आपल्या मुलीचं लग्न अब्बूसोबत लावण्याचा निर्णय घेतला. मुलीचं वय सोळा तर अब्बू तिच्याहून 20 वर्षांनी मोठा. साहजिकच मुलीनं नकार दिला. मात्र तिच्या नकाराला कुणीही जुमानलं नाही. अखेर तिचं लग्न करण्यात आलं.

हे ही वाचा : कोल्हापूर : तरुणीला झाडीत नेलं, अन् 'व्हायरल'ची धमकी देऊन 10 महिने चौघांनी लचके तोडले

अनेकदा पाहिलं आक्षेपार्ह अवस्थेत

सुरुवातीला अब्बू पत्नीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहू लागला. मात्र काही महिन्यांतच त्याच्या सासरवाडीच्या फेऱ्या वाढल्या. याचं कारण अर्थातच प्रेयसीला म्हणजे सासूला भेटणं. फिर्याद देताना मृत विवाहितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मृत मुलीने तिच्या आईला आणि नवऱ्याला अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यावरुन घरात सातत्याने वाद-विवाद होत होते. यामुळे दोन्हीही आरोपी त्रस्त होते. वडिलांनी सांगितले की, ते दोघं बरेच दिवस घराबाहेर रहायचे आणि घरात असले तर एका खोलीत बंद असायचे.

हे ही वाचा : निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार का घेतली?

वडिलांनी सांगितला घटनाक्रम

वडिलांनी सांगितले की, जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा ते घरी नव्हते. ते घरी आल्यावर मुलीची तब्येत बरी नसल्याने तिला दवाखान्यात नेले होते आणि आता ती झोपलीये, असं दोघांनी तिला सांगितलं. वडिलांनी बघितले तर ती बेशुद्धावस्थेत घरातच होती. तेव्हा सर्वांना तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. सासू आणि जावई तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी घाई करु लागल्याने वडिलांचा संशय बळावला. आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर सगळी वस्तुस्थिती समोर येईल.