कोल्हापूर : तरुणीला झाडीत नेलं, अन् 'व्हायरल'ची धमकी देऊन 10 महिने चौघांनी लचके तोडले

मुंबई तक

Kolhapur Crime News : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चार तरुणांनी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर गेल्या दहा महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Kolhapur Crime News
Kolhapur Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : तरुणीला झाडीत नेलं,

point

अन् 'व्हायरल'ची धमकी देऊन 10 महिने चौघांनी लचके तोडले

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील मुरगूड परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला ओळखपत्र तयार करून देण्याचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर तब्बल दहा महिने वारंवार अत्याचार करण्यात आले. मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके (वय 24) याने सुरुवातीला तरुणीचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती दाखवून तिचे शोषण करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला कोणालाही काहीही सांगितले नाही, परंतु नराधमांनी या भीतीचा फायदा घेऊन क्रूरतेची सीमा गाठली.

हेही वाचा : पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?

चौघांकडून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार 

या प्रकरणात आदित्य शेटकेसोबतच त्याचे इतर तीन साथीदार रणजित संभाजी मुधोळकर (वय 29), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय 24) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय 22) हे देखील सामील असल्याचे उघड झाले आहे. मुख्य आरोपी आदित्यने पीडितेची ओळख रणजित मुधोळकर याच्याशी करून दिली. त्यानंतर रणजितने तरुणीला गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापूरमधील विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार ब्लॅकमेल केले. या आरोपींच्या जाळ्यातून सुटका होण्याऐवजी पीडिता अधिकच अडकत गेली आणि नराधमांचे धाडस वाढत गेले.

हेही वाचा : गंधर्व विवाहाच्या बहाण्याने उच्चशिक्षित तरुणींवर लैंगिक अत्याचार, इंजिनिअर साधूला अटक

हे वाचलं का?